Headlines

कल्याणमधील गुंडाला डीसीपी अतुल झेंडेंनी चांगलाच धुतला:पोलिसांच्या कारवाईचा व्हिडिओ व्हायरल; किरकोळ कारणावरून गोळीबार




कल्याण पूर्वेतील आत्मारामनगर परिसरात बुधवारी रात्री गुंडगिरीचा एक भयंकर प्रकार उघडकीस आला. वाहनाला कट लागल्याच्या एका अत्यंत किरकोळ कारणावरून गुंडांच्या दोन गटांमध्ये मोठा वाद उफाळून आला. या वादाचे रूपांतर थेट हाणामारी आणि गोळीबारात झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. दुर्दैवाने, या दोन गटांच्या संघर्षात एका निष्पाप नागरिकाला गोळी लागली असून, तो गंभीर जखमी झाला आहे. सध्या या जखमी नागरिकावर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या गंभीर घटनेची माहिती मिळताच कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत धडक कारवाई केली. पोलिसांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांना घटनास्थळीच चांगला चोप दिला. डीसीपी झेंडे यांनी गुंडांवर केलेल्या या कठोर कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. परिसरातील वाढत्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी दाखवलेल्या या आक्रमक भूमिकेचे स्थानिक नागरिकांकडून जोरदार स्वागत व कौतुक केले जात आहे. गाडीचा कट लागळ्याच्या कारणावरून थेट गोळीबार आत्मारामनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुंडगिरी आणि दहशत कमालीची वाढली असून, व्यापाऱ्यांकडे खंडणी मागणे, नागरिकांना विनाकारण त्रास देणे आणि रात्रीच्या वेळी नशेखोरांकडून महिलांची छेड काढणे अशा तक्रारी वारंवार समोर येत होत्या. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी यापूर्वीही काही कारवाया केल्या होत्या. मात्र, बुधवारी रात्री वाहनाला केवळ कट लागल्याच्या एका अत्यंत किरकोळ कारणावरून गुंडांचे दोन गट थेट आमनेसामने आले आणि या वादाचे रूपांतर थेट गोळीबाराच्या भयंकर घटनेत झाले. डीसीपी अतुल झेंडेंची धडक कारवाई या घटनेची माहिती मिळताच कल्याण परिमंडळाचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत धडक मोहीम राबवली आणि संबंधित आरोपींच्या तात्काळ मुसक्या आवळल्या. विशेष म्हणजे, या कारवाईदरम्यान डीसीपी झेंडे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत आरोपींना चांगलाच चोप दिला असून, गुंडांना वठणीवर आणतानाचा त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोलिसांच्या कारवाईचे स्थानिकांकडून स्वागत पोलिसांच्या या धडक कारवाईचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून या आक्रमक भूमिकेचे जोरदार स्वागत केले जात आहे. या कारवाईतून ‘परिसर गुंडामुक्त आणि भयमुक्त ठेवण्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेलाच प्राधान्य’ असल्याचा स्पष्ट संदेश पोलिसांकडून दिला गेल्याची चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. दरम्यान, या गोळीबार प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू असून, या घटनेतील संबंधित आरोपींवर आणखी कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *