Headlines

अकोल्यात चेंबरचे विदर्भ मुख्यालय- रुहाटिया:महाराष्ट्र चेंबरच्या विदर्भ उपाध्यक्षपदी सिद्धार्थ रुहाटिया यांची बिनविराेध निवड; काैतूकाचा वर्षाव‎




राज्यातील व्यापार व उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य आणि नामांकित संघटना असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर च्या विदर्भ उपाध्यक्षपदी अकोल्याचे प्रसिद्ध उद्योजक सिद्धार्थ रुहाटिया यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत विदर्भाने ऐतिहासिक यश संपादन केले असून, विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांचे उपाध्यक्षही अनविरोध निवडून आले आहेत. सिद्धार्थ रुहाटिया यांच्यासह विदर्भातून सुमित मालाणी, अमित पडगिलवार, कैलाश खंडेलवाल, पंकज राठी, संतोष मूंदडा, दिनेश समाद्दर आणि उमेश नरनोलिया यांच्यासह एकूण १५ सदस्यांची शासकीय परिषद सदस्य म्हणून अविरोध निवड झाली आहे. दरम्यान, चेंबरच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी करुणाकर शेट्टी व संगीता पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली असून, या पदाचा निकाल १५ जून रोजी जाहीर होणार आहे. राज्यातील व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्राशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर सर्व नवनियुक्त पदाधिकारी एकत्रितपणे प्रभावीपणे काम करणार आहेत. या कार्यकारिणीची बैठक लवकरच होणार असून त्यात राज्याच्या औद्योगिक व व्यापारी विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील. शासन दरबारी संस्थेचा दबदबा महाराष्ट्र चेंबर ही राज्यातील व्यापारी व कृषी क्षेत्राचा शासन दरबारी आवाज उठवणारी प्रमुख संस्था आहे. चेंबरचे विदर्भ मुख्यालय लवकरच अकोला येथून सुरू करण्याचा आमचा मानस आहे, असे नवनियुक्त विदर्भ उपाध्यक्ष सिद्धार्थ रुहाटिया यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *