![]()
सर परशुरामभाऊ महाविद्यालयाची इयत्ता १२ वीची विद्यार्थिनी भाविका अहिरे हिची १९ वर्षांखालील भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार म्हणून निवड झाली आहे. ती बंगळूरु येथील क्रिकेट अकादमीमध्ये रुजू होऊन श्रीलंका संघासोबतच्या आगामी दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या निवडीबद्दल महाविद्यालयात भाविकाचा सत्कार करण्यात आला. शि.प्र. मंडळीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राधेश्याम अग्रवाल यांच्या हस्ते हा सत्कार पार पडला. यावेळी भाविकाचे वडील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील, उपप्राचार्य दिनेश सूर्यवंशी, कुटुंबातील सदस्य, क्रीडाशिक्षक आणि प्राध्यापक उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, उच्च प्रतीच्या क्रीडाक्षेत्राची परंपरा असलेल्या स.प. महाविद्यालयासाठी आणि पुणे शहरासाठी हा एक अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. शि.प्र. मंडळीद्वारे येत्या काळात नवे क्रीडा धोरण बनवून क्रीडा विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहाय्य व प्रोत्साहन देण्याची योजना असल्याचेही त्यांनी नमूद केले. भाविकाच्या या यशाबद्दल शि.प्र. मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष सुधीर काळकर, सदस्य तुषार कुलकर्णी, पराग ठाकुर यांच्यासह सर्व सदस्य तसेच महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सौंदर्यशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय सिडेस्को परीक्षेचे पदवीदान उत्साहात इम्प्रेशन इंटरनॅशनल ॲकॅडमीतर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सौंदर्यशास्त्राच्या सिडेस्को परीक्षेच्या पदवीप्रदान समारंभाचे आयोजन पुण्यातील पी वाय सी हॉल येथे करण्यात आले होते. या सिडेस्को परीक्षेचा पदवीदान समारंभात सिडेस्को मीडिया मेक अप व सिडेस्को ब्युटी थेरपी या अभ्यासक्रमाच्या १५ विद्यार्थिनींना इम्प्रेशन इंटरनॅशनल अकॅडमीच्या संचालिका कल्याणी उमराणी, पुष्पा भगत यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी वीस वर्षापेक्षा जास्त अनुभव व यशस्वी झालेल्या इम्प्रेशन इंटरनॅशनल ॲकॅडमी मधून सिडेस्को परीक्षेची पदवी घेतलेल्या माजी विद्यार्थिनींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सिडेस्को ही एक सौंदर्यशास्त्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रतिष्ठित परीक्षा असून ब्युटी थेरपी व मेकअप क्षेत्रात चांगल्या करिअरच्या संधी यामध्ये उपलब्ध आहेत.
Source link
स.प. महाविद्यालयाची भाविका भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार:19 वर्षांखालील महिला संघाचे नेतृत्व करणार, महाविद्यालयाचा गौरव