Headlines

अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी अक्कलकोटमध्ये 1 लाख भाविक:पहाटेपासूनच वटवृक्ष स्वामी मंदिर परिसर गजबजला; वाहनांच्या लांबच लांब रांगा‎




अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात अधिक मास व उन्हाळी सलग सुट्याचा शेवटचा दिवस, शनिवार, रविवारी यामुळे पहाटेपासून दिवसभर सुमारे एक लाखपेक्षा जास्त भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. पहाटे ५ वाजल्यापासूनच शनिवारी मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजून गेले. उन्हाळी सुट्टी व अधिक मास शेवटचा दिवस, शनिवार रविवार सुट्टी यामुळे भाविकांची संख्या दुपटीने वाढली. हत्ती तलाव परिसर, अन्नछत्र मंडळ प्रांगणातील पार्किंगसह सर्वच पार्किंग भाविकांच्या वाहनाने भरून गेली होती. श्री वटवृक्ष स्वामी मंदिर ते समाधी मठापर्यंत मुख्य रस्त्यावर स्वामीभक्त दिसत आहेत. शनिवार, रविवारी २ दिवसांत सुमारे १ लाखपेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले. पुरुष व महिलांसाठी दोन स्वतंत्र रांगा होत्या. मंदिर परिसर, अन्नछत्र मंडळ प्रांगण, समाधीमठ , राजेराय मठ, शिवपुरी, गुरुमंदिर आदी ठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती. तासाभरात सुमारे ४ ते ५ हजार भाविक दर्शन घेत होते. तसेच समाधी मठ, चोळप्पा घर, राजेराय मठ, शिवपुरी , गुरुमंदिर, अन्नछत्र मंडळ आदी ठिकाणी गर्दी केली होती. शाळांना सुट्टी असल्याने भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भाविक धार्मिक पर्यटनांचा कुंटुंबियासह लाभ घेतला. अक्कलकोट तीर्थक्षेत्र भाविकांनी फ़ुलुन गेले. अधिक मासतील व सलग सुट्टीतील शेवटच्या दिवशी वाढलेल्या गर्दीचे नियोजन करण्यात आले. पोलिसांनी कमलाराजे चौक, कारंजा चौक, अन्नछत्र अन्नछत्र मंडळ परिसर येथे बारेकेटींग करून वाहनांना मंदिर परिसरात सोडले नाही. अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानातील दर्शनानंतर भाविक अन्नछत्र मंडळात महाप्रसादासाठी गर्दी केली. येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंह भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र मंडळ परिसरात महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. हत्ती तलाव परिसरात पूल व हत्ती तलाव काम सुरू असल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. मैंदर्गी रोडवरून अन्नछत्र मंडळ प्रांगण, कमलाराजे चौक परिसर, मल्लिकार्जुन मंदिर बस स्थानक, समाधी मठ, हत्ती तलाव परिसर, विरक्त मठ परिसर आदी ठिकाणी पार्किंग होते. पार्किंग सोय- तरीही वाहतूक कोंडी भाविकांनी समाधान व्यक्त केले ^अधिक मास व सलग उन्हाळी सुट्टीचा शेवटचा दिवस यामुळे अन्नछत्र मंडळ परिसर भाविकांनी फ़ुलुन गेले. महाप्रसाद घेऊन व विविध न्यासाचे विविध उपक्रम पाहून भाविकांनी समाधान व्यक्त केले. अमोलराजे भोसले, मुख्य कार्यकारी अध्यक्ष



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *