Headlines

Ghati MBBS Internship Orders Distributed; Dr. Sukre Urges Patient Service


छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे एमबीबीएसच्या यशस्वी विद्यार्थ्यांना सक्तीच्या फिरत्या आंतरवासिता (Compulsory Rotatory Internship) आदेशांचे वाटप करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी विद्यार्थ

.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (MUHS) जाहीर केलेल्या ‘बीपीएस’ च्या निकालात घाटीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवले आहे. महाविद्यालयातून परीक्षेला बसलेल्या १९४ विद्यार्थ्यांपैकी १७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, महाविद्यालयाचा एकूण निकाल ९०.७५ टक्के लागला आहे.

या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी १५ जून रोजी घाटीच्या बजाज संकुल येथे आंतरवासिता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना ‘द फिजिशियन प्लेज’ (वैद्यकीय शपथ) देण्यात आली आणि १ वर्षाच्या इंटर्नशिपसाठी विविध विभागांमध्ये आदेशांचे वितरण करण्यात आले.

डॉ. सुक्रे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, वैद्यकीय सेवा हा एक पवित्र व्यवसाय आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रात्यक्षिक ज्ञानावर भर द्यावा. रुग्णांना सौजन्याची वागणूक देऊन कठोर परिश्रमाच्या जोरावर पालकांचे स्वप्न साकार करावे. शासनाकडून डॉक्टरांना घडवण्यासाठी उत्तम दर्जाच्या सुविधा मिळत असल्याने, विद्यार्थ्यांनीही शासनाची बांधिलकी जपून रुग्णांना अतिउच्च दर्जाची सेवा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास उपअधिष्ठाता डॉ. विनोद मुंडडा, उपअधिष्ठाता डॉ. सुरेश हरबडे, प्राध्यापक व जनऔषधवैद्यकशास्त्र प्रमुख डॉ. भारत चव्हाण, प्राध्यापक व अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ डॉ. लिंगायत, न्यायवैद्यकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. राधेय खेत्रे, प्रभारी आंतरवासिता अधिकारी डॉ. शैलेश पालवे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुचिता जोशी यांच्यासह इतर डॉक्टर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *