Headlines

चिमुकलीने घेतली थेट मुख्यमंत्र्यांची मुलाखत!:शाळेच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांचा विद्यार्थ्यांसोबत खास संवाद, VIDEO




महिनाभराच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर आजपासून राज्यातील शाळा अधिकृतपणे पुन्हा सुरू झाल्या असून, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये एक अनोखा उत्साह आणि चैतन्य पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या या उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी राज्यभरातील विविध शाळांमध्ये मंत्री, लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांकडून पहिल्याच दिवशी त्यांचे अत्यंत आनंदात स्वागत करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल तालुक्यातील वहाळ येथील जिल्हा परिषद शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेत राबवली जाणारी आधुनिक शिक्षणपद्धती आणि शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याचे भरभरून कौतुक केले. “आज जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा हा 90 टक्के खाजगी शाळांपेक्षाही अधिक चांगला आणि गुणवत्तापूर्ण झाला आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. या शाळेच्या भेटीदरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची एक छानशी मुलाखत या शाळेतील एका चिमुकल्या विद्यार्थिनीने घेतली आहे. तिने सहजपणे विचारलेले प्रश्न आणि त्यातून रंगलेला हा संवाद खऱ्या अर्थाने आनंद देऊन गेला. तिच्या निरागसतेमुळे हा क्षण अधिकच आपुलकीचा आणि हृदयस्पर्शी ठरला. पाहा व्हिडिओ..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *