Headlines

संतवाणी, अन् वीरगीतांनी रंगली मैफल:बार्शीत अवधूत गांधी यांच्या भक्ती-शक्ती संगम मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद‎



छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ, सोलापूर यांच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त बार्शी शहरात आयोजित करण्यात आलेल्या प्रख्यात लोकगायक अवधूत गांधी यांच्या ‘भक्ती-शक्ती संगम’ या सांगीतिक कार्यक्रमाला बार्शीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

.

बार्शीतील लिंगायत बोर्डिंग येथे झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी प्रारंभी शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण करत त्यांच्या शौर्य, विचार, आदर्श आणि इतिहासाचे स्मरण केले. यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, सचिव गंगाधर गावसाने, संचालक पुरुषोत्तम कारकल, ऋषिकेश कुलकर्णी, रावसाहेब मनगिरे, अमित आपटे, अरुण ग्रामोपाध्ये, ओम माढेकर, नीलेश घाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात हार्मोनियमवादक यांच्या सह सर्व वादकांनी गायकांनी उत्कृष्ट साथसंगत केली. त्यांच्या कलाविष्काराला उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली. संबळ, तबला आणि ढोलकीच्या जुगलबंदीने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. जोशपूर्ण वादनामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अवधूत गांधी यांनी सादर केलेले ‘देह विठ्ठल’, तसेच ‘पावनखिंड’ चित्रपटातील ‘युगत मांडली’ आणि ‘शिवबा राजा’ यांसारख्या वीररसपूर्ण गीतांनी कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले.

छत्रपती महाराजांच्या विचारांचा आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या बार्शीतील विविध संस्था व संघटनांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अवधूत गांधी यांनी आपल्या सुमधुर आवाजातून भक्तिसंगीत आणि शिव-शंभूंच्या कीर्तीचे वर्णन करणाऱ्या गीतांची बहारदार मैफल रंगवली. संतवाणी, अभंग, भारूड, गोंधळ आणि भक्तिगीतांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. या कार्यक्रमातून मराठी संस्कृतीचे दर्शन घडले तसेच वारकरी परंपरेचा वारसा जपत शिवकालीन घटना आणि प्रसंगांना उजाळा देण्यात आला.त्यांच्या या कलाविष्काराला उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *