Headlines

पुण्यात कौटुंबिक छळाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या:शुक्रवार पेठेतील घटना, पत्नी, मुलगा अन् मुलीवर गुन्हा दाखल




पुण्यात पत्नी, मुलगा आणि मुलीच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवार पेठेत घडली असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजीव मनोहर पायगुडे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी मनीषा उर्फ मंगल, मुलगी स्मृती आणि मुलगा रोहित यांच्याविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत राजीव पायगुडे यांचे भाऊ रवींद्र मनोहर पायगुडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, राजीव यांना त्यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलीकडून शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता, ज्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. पोलिस उपनिरीक्षक एस. दाढे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. उज्जैनला दर्शनासाठी गेलेल्या मुलाचा नदीत बुडून मृत्यू दरम्यान, मध्य प्रदेशातील उज्जैन येथे श्री महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या पुण्यातील एका तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे लोहगाव परिसरात शोककळा पसरली आहे. आदित्य चौगुले (वय 19, रा. साठेनगर, मोझे शाळेजवळ, लोहगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. आदित्य हा श्री महाकालेश्वराचा भक्त होता आणि तो दर्शनासाठी उज्जैनला गेला होता. दर्शनानंतर तो नदीत आंघोळीसाठी उतरला असता, पाय घसरून पाण्यात बुडाला. आदित्यचा संपर्क तुटल्याने त्याचे आई-वडील चिंतेत होते आणि त्यांनी उज्जैन गाठले. पोलिसांकडे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यावर त्यांना तीन दिवसांपूर्वी नदीत सापडलेल्या मृतदेहाची माहिती मिळाली. आई-वडिलांनी छायाचित्रांवरून मृतदेहाची ओळख पटवली आणि उज्जैन येथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आदित्य महाविद्यालयीन शिक्षण घेत होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *