Headlines

भरतीचा खेळखंडोबा:वसंतराव नाईक कॉलेजच्या प्राचार्यांची नियुक्ती वादात; 'बामुक्टो' संघटनेकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी




छत्रपती संभाजीनगर येथील सिडको परिसरातील प्रसिद्ध वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची नियुक्ती आता एका मोठ्या वादात सापडली आहे. महाविद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य डॉ. संजीव एम. रेड्डी यांची नियुक्ती पूर्णपणे बेकायदेशीर आणि नियमबाह्य पद्धतीने झाली असल्याचा गंभीर आरोप ‘बामुक्टो’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना) या संघटनेने केला आहे. या संदर्भातील एक सविस्तर तक्रार पत्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. बप्पासाहेब म्हस्के आणि सचिव डॉ. मारोती तेगमपुरे यांनी उच्च शिक्षण विभागाच्या सह-संचालकांना दिले आहे. या नियुक्तीची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून प्राचार्यांच्या वेतन निश्चितीला स्थगिती देण्यात यावी, अशी आक्रमक मागणी संघटनेने केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? वसंतराव नाईक महाविद्यालयातील प्राचार्य पदासाठी २७ एप्रिल २०२४ रोजी पहिली जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीच्या नियमांनुसार पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३० दिवसांची म्हणजेच २६ मे २०२४ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे वेळेत मुलाखती होऊ शकल्या नाहीत, ज्यामुळे संस्थेने ८ जानेवारी २०२६ रोजी या प्रक्रियेला मुदतवाढ दिली. ‘बामुक्टो’ संघटनेचे मुख्य ३ कायदेशीर आक्षेप संघटनेच्या प्रमुख मागण्या १. या संपूर्ण संशयास्पद भरती प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय कायदेशीर चौकशी लावण्यात यावी. २. चौकशीचा अंतिम अहवाल येत नाही, तोपर्यंत डॉ. संजीव एम. रेड्डी यांच्या प्राचार्य पदाच्या वेतन निश्चितीला (Pay Fixation) तात्काळ स्थगिती द्यावी. ३. कायदेशीर पडताळणी प्रलंबित असताना त्यांना शासकीय निधीतून कोणताही आर्थिक लाभ दिला जाऊ नये. प्रशासनाला इशारा जर कायदेबाह्य पद्धतीने प्राचार्यांना आर्थिक लाभ किंवा वेतन मंजूर केले गेले, तर याची संपूर्ण प्रशासकीय आणि आर्थिक जबाबदारी उच्च शिक्षण सह-संचालक कार्यालयाची राहील, असा थेट इशारा संघटनेने पत्रात दिला आहे. तक्रारीच्या प्रती कोणाकोणाला पाठवल्या? या गंभीर प्रकरणाची दखल घेण्यासाठी ‘बामुक्टो’ संघटनेने या पत्राच्या प्रती (Carbon Copies) महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव (मंत्रालय), उच्च शिक्षण संचालनालय (पुणे चे संचालक) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू व प्र-कुलगुरू यांनाही पुढील कारवाईसाठी पाठवल्या आहेत. या पत्रामुळे आता शहरातील शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाच्या भरतीबाबत आम्ही संस्थेचे संस्थाचालक आणि सध्याचे प्राचार्य डॉ. संजीव रेड्डी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची या प्रकरणावरची भूमिका समजू शकली नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *