Headlines

देवांशने 44 सेकंदात 24 देशांची चलने ओळखली:लाखांदूरच्या देवांशची 'इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद




भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील देवांश शिवशंकर कलंत्री याने डोळे बंद करून ४४ सेकंदात जगातील २४ देशांची चलने अचूक ओळखण्याचा विक्रम केला आहे. या कामगिरीमुळे त्याची ‘इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. देवांशने ‘मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन’ तंत्राचा वापर करून हे कौशल्य आत्मसात केले. डोळ्यांवर पट्टी बांधलेली असतानाही, समोर ठेवलेली विविध देशांची नाणी आणि नोटा तो अचूकपणे ओळखत होता. या विक्रमानंतर देवांशने भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची भेट घेतली. यावेळी त्याने पोलीस अधीक्षकांसमोर आपल्या या क्षमतेचे प्रात्यक्षिक सादर केले. देवांशच्या या अचूकतेने आणि एकाग्रतेने पोलीस अधीक्षक प्रभावित झाले. पोलीस अधीक्षकांनी देवांशचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. त्यांनी ‘मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन’ कोर्सबद्दल उपस्थित मार्गदर्शकांकडून माहिती घेतली. ग्रामीण भागातील मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते मोठी कामगिरी करू शकतात, असे सांगत नुरुल हसन यांनी देवांशला पुढील वाटचालीस प्रोत्साहन दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *