![]()
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक घडामोडी समोर येत असून, आता तिचे वडील सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाबाबत केलेल्या सोशल मीडिया पोस्टनंतर हे पाऊल उचलण्यात आले असून, याच दाव्याची नोटीस देण्यासाठी सतीश सालियान आज, शनिवारी दुपारी चार वाजता थेट ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जाणार आहेत. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सतीश सालियान यांनी स्वतःसाठी पोलिस संरक्षणाचीही मागणी केली आहे. माध्यमांशी बोलताना दिशाच्या वडिलांनी मोठा दावा केला आहे, ते म्हणाले, उशीर का होईना सीबीआयने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मुंबई पोलिसांच्या चुकीच्या गोष्टीने सर्व बनाव रचून ही केस दाबण्याचा प्रयत्न केला. कॉमन मॅनची ताकद आम्ही दाखवू, असा इशारा सतीश सालियान यांनी दिला आहे. ते म्हणाले, मी आज मातोश्रीवर पत्र घेऊन जाणार आहे. त्या सरकारमध्ये असलेल्या नेत्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी हे सर्व केले. मात्र आम्हाला न्यायची अपेक्षा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. वकील निलेश ओझा म्हणाले या प्रकरणावर बोलताना म्हणाले, त्यांनी आम्हाला धमक्या दिल्या, तुम्ही येऊन दाखवा, नोटीस देऊ देणार नाही, बघून घेऊ, त्यामुळे आम्ही स्वतः जाणार आहोत. नाहीतर आम्ही न्यायालयामार्फत नोटीस देऊ शकत होतो. आमच्याकडे जो सर्वात मोठा पुरावा होता, तो व्हिडिओचा होता आणि आम्ही तो सीबीआयला कालच दिला आहे. त्यामुळे आता तसा तपास होईल. हायकोर्टच्या निर्देशानुसार आता तपास होणार आहे. सुप्रीम कोर्टात देखील आम्ही सर्व काही दिले आहे, आम्हाला विश्वास आहे की आता आम्हाला न्याय मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे. नितेश राणेंची ठाकरे आणि राऊतांवर सडकून टीका या प्रकरणावरून मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे ड्रग्स सेवन करतायत असे आम्ही ऐकतोय आणि त्याचा साठा संजय राऊतला दिलेला दिसतोय. ते नेहमीसारखे वेड्यासारखे करतायेत. किती वर्ष तीच टेप रेकॉर्डर आम्ही ऐकतोय. एवढी वर्षे तुमची सत्ता होती, तेव्हा तुम्ही चौकशी का केली नाही? तुम्हाला कोणी थांबवले होते? स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना चौकशी का केली नाही? लोकही आता याला कंटाळले आहेत. ‘ही एका बापाची लढाई, संजय राऊतांनी गप्प बसावे’ या प्रकरणात राजकारण न आणण्याचे आवाहन करत नितेश राणे पुढे म्हणाले की, संजय राऊत किंवा उबाठाचे लोक जेवढे तोंड उघडतील, तेवढा मालकाचा मुलगा अडचणीत येणार आहे. आम्हाला यात बिलकुल राजकारण करायचे नाही. ही एका बापाची आपल्या मुलीसाठी असलेली लढाई आहे. यामध्ये कोणत्याही राजकीय व्यक्तीने येऊ नये. सतीश सालियान जे करत आहेत, ते त्यांच्या मुलीसाठी करत आहेत. ही लोकं जेवढी बोलतील, त्यामुळे आदित्य ठाकरेंना अटक करावी लागेल. तसेच, मी संजय राऊतांना मैत्रीचा सल्ला देईन की, त्यांनी कृपया गप्प बसावे आणि आपल्या मालकाच्या मुलाला सुरक्षित ठेवावे, असा इशाराही त्यांनी दिला. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. संजय राऊत जेवढं तोंड उघडतील, तेवढा मालकाचा मुलगा अडचणीत येईल!:नितेश राणेंचा थेट इशारा- गप्प बसा अन् आदित्यला सुरक्षित ठेवा! “खासदार संजय राऊत रोज सकाळी उठून वेड्यासारखी बडबड करत आहेत. ते आणि उबाठा गटाचे नेते जेवढे तोंड उघडतील, तेवढा त्यांच्या मालकाचा मुलगा म्हणजेच आदित्य ठाकरे अधिक अडचणीत येणार आहे. सतीश सालियन हे आपल्या मृत मुलीच्या न्यायासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार लढा देत आहेत. यात कोणीही राजकारण करू नये. राऊतांनी जास्त तोंड उघडल्यास पोलिसांना आदित्य ठाकरेंना लवकरच अटक करावी लागेल,” असा थेट इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. सिंधुदुर्ग येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. वाचा सविस्तर
Source link
'कॉमन मॅन'ची ताकद दाखवून देऊ':दिशा सालियानचे वडील थेट 'मातोश्री'वर धडकणार, ठाकरेंसह मुंबई पोलिसांवरही गंभीर आरोप