Headlines

Nitesh Rane Warning to Aditya Thackeray & Sanjay Raut


“खासदार संजय राऊत रोज सकाळी उठून वेड्यासारखी बडबड करत आहेत. ते आणि उबाठा गटाचे नेते जेवढे तोंड उघडतील, तेवढा त्यांच्या मालकाचा मुलगा म्हणजेच आदित्य ठाकरे अधिक अडचणीत येणार आहे. सतीश सालियन हे आपल्या मृत मुलीच्या न्यायासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार

.

आदित्यच्या ड्रग्जचा साठा राऊतांना मिळालाय का?

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत घेतलेल्या आक्षेपांचा समाचार घेताना नितेश राणे म्हणाले, “आदित्य ठाकरे ड्रग्जचे सेवन करतात असे आम्ही ऐकतोय. कदाचित त्याचाच थोडा साठा त्यांनी सकाळी सकाळी संजय राजाराम राऊत यांना दिलेला दिसतोय. त्यामुळेच ते नेहमीसारखी वेड्यासारखी विधाने करत सुटले आहेत.”

“कणकवलीतील जुन्या खुनांची नावे घेऊन राऊत वर्षानुवर्षे तीच जुनी टेप रेकॉर्डर वाजवत आहेत. आता जनताही त्यांच्या या रटाळ आरोपांना कंटाळली आहे. त्यांच्या या विधानांवर आता कोणीही विश्वास ठेवत नाही.”

सत्ता असताना चौकशी का केली नाही? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते ना!

राऊतांनी उपस्थित केलेल्या जुन्या प्रकरणांच्या आरोपांवर पलटवार करताना राणे म्हणाले, “मध्यंतरीच्या काळात अडीच वर्षे राज्यात तुमचीच सत्ता होती. स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. गृहखाते आणि संपूर्ण पोलीस यंत्रणा तुमच्या हातात होती, मग तेव्हा चौकशी करून सत्य बाहेर का आणले नाही? तुम्हाला कोणी रोखले होते? एवढी बलाढ्य सत्ता हातात असताना काही करायचे नाही आणि आता पराभव समोर दिसू लागल्यावर जुने आरोप उकरून काढायचे, हा निव्वळ ढोंगीपणा आहे.”

ही एका पित्याची न्यायासाठीची लढाई; राजकीय हस्तक्षेप नको

दिशा सालियन प्रकरणावर बोलताना नितेश राणे यांनी ही कोणत्याही पक्षाची लढाई नसून एका हवालदिल पित्याची लढाई असल्याचे स्पष्ट केले, “आम्हाला या प्रकरणात कोणतेही घाणेरडे राजकारण करायचे नाही किंवा कोणालाही विनाकारण व्हिक्टिमाइज (बळी) करायचे नाही. ही एका बापाची आपल्या निष्पाप मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेली कायदेशीर लढाई आहे. न्यायालयाच्या निर्देशांनुसार सतीश सालियन ही पावले उचलत आहेत.”

“या संवेदनशील विषयात कोणत्याही राजकीय व्यक्तीने स्वतःच्या फायद्यासाठी नाक खुपसू नये. ही कौटुंबिक आणि भावनिक वेदना आहे, त्यामुळे यावर कोणीही राजकीय विधाने करू नयेत.”

संजय राऊतांना ‘मैत्रीचा’ सल्ला- गप्प बसा, नाहीतर अटक अटळ

शेवटी संजय राऊत यांना थेट सल्ला देताना नितेश राणे म्हणाले, “उबाठा गटाचे नेते जेवढे जास्त बोलतील, तेवढे नवनवीन पुरावे आणि धागेदोरे पोलिसांच्या हाती लागतील. राऊतांच्या अशा बेताल बोलण्यामुळे शेवटी पोलिसांना आदित्य ठाकरे यांच्यावर अटकेची कारवाई करावीच लागेल.”

“मी संजय राजाराम राऊतांना एक मैत्रीचा आणि मोलाचा सल्ला देतो— कृपया आता तरी तोंड बंद ठेवा, गप्प बसा आणि आपल्या मालकाच्या मुलाला सुरक्षित ठेवा; अन्यथा पुढचे परिणाम त्यांनाच भोगावे लागतील,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

CBI तपासामुळे प्रकरण पुन्हा चर्चेत

दिशा सालियन यांचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूच्या परिस्थितीबाबत संशय व्यक्त करत सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने CBI कडे तपास सोपवण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने तपासादरम्यान पुरेसा आधार मिळेपर्यंत कोणालाही आरोपी म्हणून संबोधू नये, असेही स्पष्ट केले होते.

यानंतर CBI ने FIR दाखल केल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले. FIR मध्ये आदित्य ठाकरे यांच्यासह काही व्यक्तींची नावे असल्याचे वृत्त आहे. मात्र, नावाचा FIR मध्ये उल्लेख असणे आणि न्यायालयीनदृष्ट्या दोष सिद्ध होणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. सध्या तपासाची प्रक्रिया सुरू असून त्यातून पुढे काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, आदित्य ठाकरे यांनी आपला दिशा सालियन यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. संजय राऊत यांनीही CBI चौकशीवर प्रश्न उपस्थित करत हा तपास ठाकरे कुटुंबाला लक्ष्य करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप केला आहे.

‘आता या चर्चेचा कंटाळा आला’

नितेश राणे यांनी आपल्या प्रतिक्रियेच्या शेवटी दिशा सालियन प्रकरणावरील वर्षानुवर्षांची राजकीय चर्चा थांबवण्याची भाषा केली. “एकच टेप रेकॉर्डर, एकच नावं घ्यायची आणि पुन्हा तेच रटाळ बोलायचं. आता या गोष्टींचा कंटाळा आला आहे,” असे ते म्हणाले.

मात्र, सध्या CBI तपास सुरू असल्याने या प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांपेक्षा तपासातून समोर येणाऱ्या अधिकृत निष्कर्षांना महत्त्व राहणार आहे. न्यायालयानेही तपासादरम्यान पुरेशा पुराव्याशिवाय कोणालाही आरोपी मानू नये, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे पुढील काळात तपास यंत्रणांकडून कोणती माहिती समोर येते आणि त्यावर न्यायालयीन प्रक्रिया कशी पुढे जाते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. —————-

हेही वाचा…

बलात्कार-खून होत असताना तुम्ही शांत का बसलात?: दिशा सालियनच्या वकिलांच्या दाव्यानंतर अखिल चित्रेंचे नारायण राणे, नितेश राणेंना 7 टोकदार सवाल

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिचे वडील सतीश सालियन यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अधिकृत कागदपत्रांवरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा प्रचंड भूकंप झाला आहे. सतीश सालियन यांच्या वकिलांनी न्यायालयात सादर केलेल्या दस्तऐवजात भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांचा उल्लेख थेट ‘प्रत्यक्षदर्शी साक्षीदार’ (Eye Witnesses) असा केला असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. जर राणे पिता-पुत्र खरोखरच त्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार होते, तर सामूहिक अत्याचार आणि खून होत असताना ते शांत का बसले होते? असा संतप्त सवाल विचारत चित्रेंनी सोशल मीडियाद्वारे राणे कुटुंबीयांवर 7 टोकदार प्रश्नांची सरबत्ती केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.