Headlines

Sanjay Raut Amidst Political Controversy; BJP Strong Counterattack


“सूर्य उगवतो तसा मावळतो हे खरे असले, तरी संजय राऊतांचा कोणताही सूर्य नाही; ती एक विझलेली अगरबत्ती आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने ती यापूर्वीच विझवून टाकली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांचे नाव घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्य

.

एपस्टीन फाइल्सच्या गप्पा कशाला? पाटकर फाइल्समध्ये तुमचे तोंड काळे झालेय!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर टीका करणाऱ्या संजय राऊतांना उत्तर देताना नवनाथ बन म्हणाले, “अमेरिकेतील एफस्टीन फाईल्सचे नाव घेऊन सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजय राऊतांचे तोंड ‘पाटकर फाईल्स’मुळे आधीच काळे झाले आहे. या ऑडिओ क्लिप्समध्ये एका माता-भगिनीला कोणत्या घाणेरड्या भाषेत शिव्या दिल्या गेल्या, हे उभ्या महाराष्ट्राने ऐकले आहे. त्यामुळे नैतिकतेच्या गप्पा मारणे त्यांना अजिबात शोभत नाही.”

2029ला मोदी पुन्हा पंतप्रधान

“देशातील जनतेने उबाठा गटाला घरी बसवले असून नरेंद्र मोदींना सलग तिसऱ्यांदा पूर्ण बहुमताने निवडून दिले आहे. २०२९ मध्ये मोदीजी चौथ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील; मात्र राऊतांचे मालक २०२९ मध्ये साधे आमदारही होऊ शकणार नाहीत. खुद्द संजय राऊत स्वतःच्या जीवावर २०२८ मध्ये आमदार किंवा खासदार निवडून आणू शकत नाहीत, ही त्यांची राजकीय लायकी आहे.”

संजय राऊत म्हणजे मातोश्री आणि उबाठाच्या कुंडलीतला ‘अमंगळ ग्रह’

राऊतांनी स्वतःला तेजस्वी ‘मंगळ’ म्हटल्याच्या विधानाची खिल्ली उडवत बन म्हणाले, “संजय राऊत हा कोणताही स्वाभिमानी मंगळ नसून मातोश्री, उबाठा गट आणि महाराष्ट्राच्या राजकीय कुंडलीतला केवळ ‘अमंगळ ग्रह’ आहे. या अमंगळ ग्रहाला कधी कोणाचे चांगले झालेले बघवतच नाही. महाराष्ट्रात कायम अस्थिरता राहावी, राजकीय द्वंद पेटत राहावे आणि समाजात तेढ निर्माण व्हावी, यासाठी राऊत रोज सकाळी आगीत तेल ओतण्याचे काम करतात.”

आदित्य ठाकरेंना दशा लागली

“संजय राऊत यांच्या या अमंगळ भूमिकेमुळेच उबाठा पक्षाची वाताहत झाली आहे. आधीच पक्षाला वाईट दशा लागलेली असताना, आता दिशा सालियन प्रकरणामुळे आदित्य ठाकरेंच्या मागे थेट कायदेशीर कारवाईची दशा लागली आहे. उबाठा गट पूर्णपणे संपवण्याची सुपारी घेतलेले हे ‘संपतराव राऊत’ आहेत.”

तुरुंगातील मदतीचा बदला घेण्यासाठी आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा डाव

दिशा सालियन प्रकरणावरून नवनाथ बन यांनी संजय राऊतांच्या राजकीय हेतूंवर अत्यंत गंभीर आरोप केला, “संजय राऊत रोज सकाळी उठून प्रसारमाध्यमांसमोर दिशा सालियन प्रकरणावर मुद्दाम बोलतात, कारण हे प्रकरण सातत्याने चर्चेत राहिले पाहिजे. आदित्य ठाकरेंची बदनामी होऊन ते राजकीय पटलावरून कायमचे दूर व्हावेत, हीच राऊतांची सुप्त इच्छा आहे.”

“संजय राऊत जेव्हा आर्थर रोड जेलमध्ये बंद होते, तेव्हा ठाकरे कुटुंबीयांनी किंवा आदित्य ठाकरेंनी त्यांना साधी मदत केली नाही. त्या अपमानाचा वचपा काढण्यासाठी आणि संपूर्ण पक्ष आपल्या नियंत्रणात आणण्यासाठी राऊत हे प्रकरण जिवंत ठेवून ठाकरे कुटुंबाला अडचणीत आणत आहेत.”

कणकवलीतील खुनांचे पुरावे होते, तर अडीच वर्षे झोपा काढत होतात का?

कणकवलीतील जुन्या गुन्ह्यांवरून नितेश राणेंवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना बन म्हणाले, “संजय राऊतांकडे जर कणकवलीतील कथित खुनांचे ठोस पुरावे होते, तर महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात ते आणि उद्धव ठाकरे काय झोपा काढत होते का? गृहखाते, पोलीस प्रशासन आणि सीबीआयकडे जाण्याचा अधिकार असताना एकही तपास का सुरू केला नाही?”

“राऊतांकडे कोणतेही पुरावे नाहीत, केवळ बिनबुडाचे आरोप करून लोकांना फसवण्याची त्यांची जुनी सवय आहे. राणे कुटुंबावर चिखलफेक करण्याआधी राऊतांनी न्यायालयात अथवा पोलिसांकडे कागदपत्रे सादर करण्याचे धाडस दाखवावे.”

जनतेने ‘इंडिया’ आघाडीचा फुटबॉल केला; यूपीआयवर दिशाभूल नको

तृणमूल काँग्रेसच्या पक्षचिन्हावर आणि केंद्र सरकारच्या निर्णयांवर भाष्य करताना भाजप प्रवक्त्यांनी स्पष्ट केले, “निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करतो. संजय राऊत स्वतः सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे घरगडी आणि गुलाम झाले आहेत. ममता बॅनर्जींच्या पक्षाला फुटबॉल चिन्ह मिळाले असले, तरी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेने उबाठा गट आणि इंडिया आघाडीचा निवडणुकीत आधीच फुटबॉल करून घरी बसवले आहे.”

यूपीआयचा निर्णय योग्यच

“यूपीआयवर सामान्य नागरिकांवर कोणताही भुर्दंड पडलेला नाही. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हा केवळ मोठ्या व्यावसायिक व्यवहारांसाठी असून सर्वसामान्य जनतेला कोणतीही झळ बसलेली नाही. मात्र खोट्या बातम्या पसरवून जनतेला भडकवण्याचे काम राऊत करत आहेत. अशीच बेताल बडबड सुरू राहिली, तर येत्या काळात जनताच त्यांना कपडे फाडून रस्त्यावर फिरायला लावेल,” असा सज्जड इशारा नवनाथ बन यांनी दिला.

————–

हेही वाचा…

कणकवलीतले खून पचवण्यासाठी यांना सत्ता हवी!: दिशा प्रकरणात ठाकरे कुटुंबावर चिखलफेकीसाठी अर्थपुरवठा कोठून होतोय? संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

“दिशा सालियन प्रकरणात केवळ ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोकांना हाताशी धरून हा घाणेरडा राजकीय खेळ सुरू आहे. अब्रूची भाषा बोलणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, आमचीही प्रतिष्ठा आणि मानमर्यादा आहे. कोणाच्या तरी हातचे बाहुले बनून आरोप करणाऱ्यांच्या पाठीशी कोणती अदृश्य शक्ती आहे आणि या संपूर्ण प्रकरणासाठी अर्थपुरवठा कुठून केला जातोय, हे आम्हाला पक्के ठाऊक आहे,” असा सणसणीत प्रतिहल्ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी चढवला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.