Headlines

पळसवाडीत शेतकऱ्यांनी स्वखर्चातून उभारला शेताकडे जाण्यासाठीचा रस्ता:प्रशासन, लोकप्रतिनिधींकडून प्रतिसाद नसल्याने शेतकऱ्यांनी घेतला पुढाकार‎



खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी गावातील शेतकऱ्यांनी शेतात जाण्यासाठी पक्का रस्ता मिळावा म्हणून गेली अनेक वर्षे प्रशासन, आमदार-खासदारांकडे मागणी केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी अखेर स्वावलंबनाचा मार्ग निवडत कोणत्याही लोकप्

.

पळसवाडीतील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आणि पिकवलेला माल बाजारात नेण्यासाठी वर्षानुवर्षे बिकट वाट तुडवावी लागत होती. पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे चिखलमय होऊन वाहतूक ठप्प होत असे. बैलगाडी, ट्रॅक्टर तर सोडाच, पायी चालणेही कठीण होत होते. पक्का रस्ता करून द्या अशी विनंती शेतकऱ्यांनी स्थानिक आमदार व खासदारांकडे वारंवार केली. पण प्रत्येक वेळी फक्त आश्वासने मिळाली. अखेर या कारभाराला कंटाळून गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. सरकारी निधीची प्रतीक्षा न करता प्रत्येक शेतकऱ्याने लोकवर्गणी दिली आणि श्रमदान केले. सर्वांनी हाती फावडे, टिपरे घेऊन शेतरस्ता तयार केला. शेतकऱ्यांच्या या एकजुटीमुळे तात्पुरता का होईना, शेतात जाण्याचा मार्ग मोकळा झाला. खत, बियाणे नेणे आणि शेतीमाल बाजारात पोहोचवणे सोपे झाले असून, शेतकऱ्यांनीच यासाठी पुढाकार घेतल्याने कौतूक होत आहे. या स्वावलंबी पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र शेतकऱ्यांची मागणी कायम आहे. कच्चा रस्ता ही तात्पुरती सोय आहे. भविष्यात पाऊस आला की पुन्हा तीच परिस्थिती. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रीटीकरण करून पक्का रस्ता करावा, असे शेतकरी सांगतात.

रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था एवढी खराब व्हायची की बैलगाडी किंवा ट्रॅक्टर तर सोडा, पायी चालणंही कठीण व्हायचं. डोक्यावर खताची पोती वाहून न्यावी लागायची, तर कधी पिकलेला माल शेतातच सडून जायचा. सरकारने आमचं ऐकलं नाही, म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लोकवर्गणी जमा केली आणि हा रस्ता तयार केला असल्याचे शेतकरी प्रकाश ठेंगडे यांनी सांगितले. आता तरी लोकप्रतिनिधींनी रस्त्याकडे लक्ष देऊन तो पक्का करून द्यावा, हीच आमची अपेक्षा असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *