![]()
येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचा माजी विद्यार्थी लव श्रीराम डफळ याची भारतीय सैन्यदलात नियुक्ती झाल्याबद्दल शाळेच्या वतीने लव डफळ तसेच त्याचे वडील यांचा मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्या
.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळावी या उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्याला एक डझन वह्या, पेन, पेन्सिल व खोडरबर यांचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य रघुनाथ पाटील मोरे, सरपंच रघुनाथ पाटील कदम, एकनाथ तायडे, भागवत पाटील मोरे, श्रीराम पाटील डफळ, ग्रामसेवक बन्सीधर पडुळकर, इंजिनियर झोंड तसेच शाळेचे सर्व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.