Headlines

उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करण्याची गरज:ठाकरेंच्या शिवसेनेतील खदखद आता बाहेर पडतेय – चंद्रशेखर बावनकुळे




शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदार फुटीच्या चर्चांदरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरे गटातील सध्याच्या घडामोडी या पक्षांतर्गत नाराजीचेच परिणाम असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे म्हटले. ठाकरेंच्या शिवसेनेतील खदखद आता बाहेर पडतेय
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जी खदखद अनेक दिवसांपासून होती, ती आता बाहेर पडत आहे. पक्षातील लोक का नाराज आहेत, खासदार आणि आमदार वेगळा विचार का करत आहेत, याचा गंभीरपणे विचार उद्धव ठाकरेंनी केला पाहिजे. विकासकामांसाठी सत्तेची गरज पडते- बावनकुळे ते पुढे म्हणाले की, लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारसंघात विकासकामे करायची असतात. त्यासाठी सत्तेची गरज पडते. सत्तेशिवाय विकासाची गती मिळत नाही. त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी वेगळे निर्णय घेत असतात. विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनाही सरकारकडून मदत मिळत असल्याचा दावा करत बावनकुळे म्हणाले, “आम्ही विरोधी पक्षातील आमदार-खासदारांनाही विकासकामांसाठी मदत करतो. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर कुणालाही अन्याय होत नाही. दरम्यान, ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, त्याच पार्श्वभूमीवर बावनकुळे यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान: 22 जूनला निकाल; संभाजीनगरमध्ये व्हीलचेअरअभावी गोंधळ, नगरसेविकेला खुर्चीवरून आणल्याने राडा राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 पैकी 6 जागांवर महायुतीने मतदानापूर्वीच बिनविरोध विजयाचा गुलाल उधळला आहे. आता उर्वरित 11 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. यात संपूर्ण राज्याचे लक्ष छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघाकडे लागले असून येथे भाजपचे सुहास शिरसाठ व ठाकरे गटाचे गणेश लोखंडे यांच्यात थेट व अटीतटीची लढत होत आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *