![]()
डफरीन चौकातील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थिनींनी मानसिक आणि धार्मिक छळ होत असल्याची तक्रार केली आहे. त्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सकल हिंदू समाजाचे समन्वयक शिवराज गायकवाड यांनी दिला आहे. दरम्यान, या तक्रारींसह पूर्वीच्या प्राचार्यांच्या कार्यकाळातील प्रशासकीय कामकाजाची चौकशी करण्यासाठी आज शुक्रवारी (ता. १९) पुणे उपसंचालक अनिल जाधव यांचे विशेष पथक सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहे.
या संस्थेत गंभीर प्रशासकीय, आर्थिक आणि धार्मिक गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी मुंबई येथील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या (डीव्हीईटी) उच्चस्तरीय मुख्य कार्यालयीन चौकशी समिती गेल्या आठवड्यात सोलापुरात आली होती. त्या समितीने काही विभागातील विद्यार्थिनींशी थेट संवाद करून त्यांचे म्हणणे नोंदवले आहे. गटनिदेशिका आणि प्राचार्य यांच्यावर हिंदू विद्यार्थिनींना कुंकू-टिकली लावण्यावरून चिडवणे, मानसिक त्रास देणे, बळजबरीने गणवेश विक्री करणे तसेच नियमबाह्य तासिका कर्मचाऱ्यांची भरती झाल्याची तक्रार सकल हिंदू समाजतर्फे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच महिला संस्थेत सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून पुरुष सफाईगारांची नियुक्ती केल्याचा आक्षेपही घेण्यात आला आहे. यापूर्वीच्या मेघना जोशी यांच्या अध्यक्षतेखालील पूर्व चौकशी समितीने दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, अशीही तक्रार निवेदनात नमूद केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी गायकवाड यांनी केली. याप्रसंगी सूरज भोसले, श्रीकांत गिड्डे, केशव म्हेत्रे, बाबा बनसोडे यांच्यासह सकल हिंदू समाजचे पदाधिकारी व कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते. या संस्थेत गंभीर प्रशासकीय, आर्थिक आणि धार्मिक गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी मुंबई येथील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या (डीव्हीईटी) उच्चस्तरीय मुख्य कार्यालयीन चौकशी समिती गेल्या आठवड्यात सोलापुरात आली होती. त्या समितीने काही विभागातील विद्यार्थिनींशी थेट संवाद करून त्यांचे म्हणणे नोंदवले आहे. चौकशीत धक्कादायक प्रकार समोर येईल तासिका तत्वारील एक कर्मचारी मुलींच्या आयटीआयमध्ये अध्यापन व अक्कलकोट आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेत असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. दोन्हीकडे उपस्थितीच्या नोंदी होत्या. प्रशासकीय चौकशीमध्ये तो सगळा प्रकार स्पष्ट झाला असून त्या प्रकरणाचा अहवाल शासनाकडे सादर झाला. मागील ५ वर्षांच्या संपूर्ण कामकाजाची चौकशी झाल्यास धक्कादायक प्रकार समोर येईल, असे सूत्रांनी सांगितले. प्राचार्य म्हणाले, कालच बार्शीला बदली झाली केलेल्या आरोपांबाबत माहिती घेण्यासाठी प्रभारी प्राचार्य प्रदीप हरिदास यांना संपर्क केला असता काल बुधवारी माझी बदली बार्शी झाली. त्यामुळे त्या तक्रारींबाबतची माहिती मी देऊ शकत नाही. तक्रार अर्जात माझ्या नावाचा उल्लेख असून, माझी बाजू मांडण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल. दरम्यान, मी सध्या तेथील प्राचार्य नसल्याने नियमानुसार तक्रारींबाबत आता मी काही सांगू शकत नाही, असे हरिदास यांनी सांगितले. महिला कर्मचाऱ्यांमधील वादामुळे संस्थेची बदनामी मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ९ पेक्षा अधिक अभ्यासक्रम व्यवस्थित सुरू आहेत. पण, ब्युटीपार्लर व शिवणकाम विभागाच्या दोन महिला कर्मचाऱ्यांमधील अंतर्गत मतभेदामुळे संस्थेची बदनामी होत आहे. इतर विभागातील विद्यार्थिनींच्या तक्रारी नाहीत. पण, त्या दोन विभागातच तक्रारी आहेत.
– मनोज बीडकर, प्रभारी प्राचार्य व्हिडीओ प्रसारित केला म्हणून बोलावले आहे शिवराज गायकवाड यांनी समाजमाध्यमांवर व्हिडिओ प्रसारित केली होती. त्या अनुषंगाने पुढील चौकशीसाठी त्यांना संपर्क केला होता. गायकवाड यांना तक्रारदार महिलेसमवेत पोलीस ठाण्यात येण्याबाबत दूरध्वनीवरून स्पष्ट सांगण्यात आले होते. मात्र, असे सांगूनही ते रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला हजर झाले नाहीत.
– दिनेश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक
Source link
सोलापूरमध्ये चाललंय काय?:'आयटीआय'मध्ये मुलींचा धार्मिक छळ; प्रशासन म्हणते, जुना वाद, सकल हिंदू समाजने दिला आंदोलनाचा इशारा