Headlines

देवगाव रंगारीत विवाहितेची विहिरीत उडी घेत आत्महत्या:पती, सासू-सासऱ्यांना अटक, पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार‎




येथील जाधव नगर परिसरातील २७ वर्षीय विवाहिता पूजा अनिल गोरे हिने घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी मृत पूजाच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजता पूजा शेतातून मक्याच्या बिट्ट्या आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. ती परत न आल्याने शोध घेतला असता, अजित दिवेकर यांच्या विहिरीच्या कड्यावर तिची चप्पल आढळली. देवगाव रंगारी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे व कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने शोध घेऊन पूजाचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अखेर सकाळी ११ वाजता पोलिस बंदोबस्तात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पूजाच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. पूजाचे भाऊ संजय श्रीरंग सोनवणे यांच्या फिर्यादीवरून पती अनिल विठ्ठल गोरे, सासू नागुबाई गोरे आणि सासरे विठ्ठल काशीनाथ गोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *