![]()
मुलीच्या लग्नासाठी शेतकऱ्याने कष्टाने जमा केलेले फिक्स डिपॉझिटचे (एफडी) पैसे बँकेने कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर पीककर्ज खात्यात वर्ग केल्याचा प्रकार सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या लासूर स्टेशन शाखेत उघडकीस आला. २४ जून रोजी मुलीचे लग्न असल्याने शेतकर
.
राऊत यांनी शेतीसाठी २०१९ मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या लासूर स्टेशन शाखेतून ८० हजारांचे पीककर्ज घेतले होते, तर २०२० मध्ये मुलीच्या लग्नासाठी १ लाख ५ हजार ४५० रुपयांची एफडी केली होती. बँकेने २०२३ मध्येच ही रक्कम परस्पर पीककर्जात जमा केली. दरम्यान, २४ जुन रोजी मुलीचे लग्न असल्याने बुधवार (१७ जून) रोजी शेतकरी गोरख राऊत बँकेत एफडी मोडण्यासाठी गेले होते. त्या वेळी एफडीची रक्कम बँकेने परस्पर पीककर्जात वळवली असल्याचे समोर आले आहे. या फसवणुकीविरोधात मनसेचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पाटील जाधव यांनी जिल्हा उपनिबंधकांना निवेदन देऊन २५ जून रोजी बँकेत अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकाराकडे वरिष्ठ कार्यालयाने लक्ष देऊन शेतकऱ्यास न्याय देण्याची मागणी केली आहे. Ãसदर प्रकार माझ्या कार्यकाळापूर्वी झालेला आहे. याबाबत वरिष्ठांना सविस्तर माहिती देऊन त्यांच्या सूचनेवरून पुढील कार्यवाही करणार आहे. – ऋषिकेश रांजणीकर, शाखा व्यवस्थापक, लासूर स्टेशन Ãमुलीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे काढायला गेलो तर बँक अधिकाऱ्यांनी ते पीककर्जात वळवल्याचे सांगितले. कोणतीही लेखी नोटीस दिली नव्हती. बँकेच्या मनमानीमुळे आर्थिक नुकसान झाले असून मी कर्जमाफीतूनही वगळलो गेलो आहे. – गोरखनाथ राऊत, पीडित शेतकरी
नोटीस न देता बँकेने पैसे हडपले