Headlines

दैनंदिन योगाभ्यासाने सुदृढ आरोग्य प्राप्त होते- कोठारी, सारडा महाविद्यालयात योगदिन उत्साहात साजरा‎




जागतिक योग दिन सारडा महाविद्यालयात १९ जून रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांना प्रशिक्षित योग साधकांनी योगाभ्यासाचे धडे दिले. यावेळी सर्वांनी विविध योगासने करत प्राणायाम व ध्यानधारणाही केली. तसेच संगीताच्या तालावर एरोबिक्स, शाळा कवायत करून उत्साहात योगदिन साजरा केला. महाविद्यालयाचे चेअरमन सुमतीलाल कोठारी यांच्या हस्ते व उपकार्याध्यक्षा प्रा.ज्योती कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत योग दिनाचे उद्घाटन झाले. २१ जून रोजी सारडा महाविद्यालयात नीट परीक्षा असल्याने गुरुवारी योग दिन साजरा करण्यात आला, अशी माहिती प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांनी दिली. कोठारी म्हणाले, योग ही आपली वैभवशाली संस्कृती व परंपरा आहे. याचे जतन करण्यासाठी हा योगदिन साजरा होत आहे. दैनंदिन योगाभ्यासाने आपण विना पैशाने मोफत सुदृढ आरोग्य प्राप्त करत असल्याने सर्वांनी नित्याने योगाभ्यास करावा. प्रा.ज्योती कुलकर्णी म्हणाल्या, तुम्ही आयुष्यात कितीही पैसे कमावले पण तुमचे आरोग्य निरोगी नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. त्यामुळे सर्वांनी निरोगी व आनंदी जीवन जगण्यासाठी रोज थोडा वेळ काढून योगाभ्यास करा, असे आवाहन त्यांनी केले. योग विभागप्रमुख प्रा. राजू रिक्कल यांनी योगाचे प्रत्याक्षिके घेतली तर व क्रीडा प्रशिक्षक संतोष खैरनार यांनी संगीताच्या तालावर एरोबिक्सचे धडे दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *