Headlines

आषाढी वारी तयारी:वारकऱ्यांची सेवा, 23 जर्मन हँगर शामियाने, 220 टँकर तर 158 तात्पुरती उपचार केंद्र, जिल्हा परिषद सीईओंची माहिती, पालकमंत्री गोरे यांनी घेतला आढावा‎



आषाढी वारीत निमित्त येणाऱ्या वारकरी मंडळींच्या सुविधेसाठी जिल्हा परिषदेकडून पालखी मार्गावरील स्वागत कमानी थाटल्या जाणार आहेत. स्वच्छतेची काळजी म्हणून ५ हजार फिरते शौचालय, २०० पाण्याचे टँकर. आरोग्यासाठी १५८ तात्पुरते उपचार केंद्र तर १२१ बाईक ॲम्बुलन्स

.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे दूर दृश्य प्रणालीद्वारे पुणे, सातारा, सोलापूर व अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांचा पालखी सोहळा नियोजनाचा आढावा पालकमंत्री गोरे यांनी घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांताधिकारी सचिन इथापे, विजया पांगारकर, आशिष लोकरे, तहसीलदार पंढरपूर सचिन लंगोटे, पंढरपूरचे मुख्याधिकारी महेश रोकडे, जी. एस. कथले, साहेबराव देसाई, महावितरणचे सुनील माने, गजानन नेरपगार आदी उपस्थित होते. पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले की, पालखी मार्गाची सुरक्षितता, रस्त्यातील अडथळे, रिंगण सोहळ्याचे ठिकाण, पालखी मुक्कामाची ठिकाणे, रस्ते व पूल दुरुस्ती अशी अन्य सर्व कामे संबंधित विभाग प्रमुखांनी स्वतः लक्ष घालून तत्परतेने पूर्ण करून घ्यावीत. तात्पुरत्या शौचालयाजवळ चिखल होऊ नये, तसेच पालखी मुक्काम स्थळी योग्य ठिकाणी काँक्रिटीकरण व मुरुमीकरण करावे, अशा सूचना दिल्या. ६५ एकर, वाळवंट परिसर आणि वाखरी या ठिकाणी स्वच्छतेबाबत आवश्यक सुविधांचे नियोजन करा. याशिवाय पालखी विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांनी माऊलींच्या पालखीच्या वतीने वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा, मोबाईल नेटवर्क उपलब्ध करून द्यावे. वाहनांना टोल माफी मिळावी, अशी मागणी केली. संत तुकाराम पालखी विश्वस्त व सोपान काका पालखी विश्वस्तांनी वारकरी सुविधांची मागणी केली.

पालखी मार्ग, रिंगण सोहळा स्थळी सुरक्षिततेची काळजी

सीसीटीव्ही, निरीक्षण टॉवर, लाईफ जॅकेट, बोटींग सुविधा स्वच्छ पाणी, निवाऱ्यासाठी जर्मन हँगर व वॉटरप्रूफ मंडप, फूट मसाज, आरोग्य सुविधा, मेडिसिन किट, स्नानगृहे, मोबाईल चार्जिंग व्हॅन, वारीतील वाहनांसाठी पुरेसे इंधन तसेच गॅस पुरवठा व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. नेटवर्क साठी टॉवरची पुरेशी सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, निरीक्षण टॉवर, ठिकठिकाणी ध्वनीक्षेपक, आपत्कालीन यंत्रणा, लाईफ जॅकेट, बोटींग सुविधा करा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *