Headlines

नसरापूर अत्याचार अन् हत्या प्रकरण:नसरापूर अत्याचारप्रकरणी 25 जून राेजी निकाल, अंतिम युक्तिवादात आराेपीला कठाेर शिक्षेची मागणी




नसरापूर येथे चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे हा पीडितेला दुपारी सव्वातीन वाजता घटनास्थळाकडे घेऊन जाताना सीसीटीव्हीत दिसत आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजून ५१ मिनिटांनी तो घटनास्थळावरून एकटाच परतत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. यावरून ३९ मिनिटे चिमुरडी आरोपीच्या ताब्यात होती. या कालावधीत आरोपीने तिच्यावर पाशवी अत्याचार करून तिचा खून करत मृतदेह लपवून ठेवला, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अजय मिसर यांनी केला. आरोपीने हे कृत्य अतिशय थंड डोक्याने, विचारपूर्वक व वासनेपोटी केले आहे. त्यामुळे त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही अ‍ॅड. मिसर यांनी अंतिम युक्तिवादात केली. या प्रकरणाचा निकाल २५ जून रोजी देण्यात येणार आहे. पोलिसांनी ११०० पानी आरोपपत्र दाखल केले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *