Headlines

डॉ. संतोष पाटील यांची थेट वनमंत्र्यांकडे तक्रार‎:रसायनाचे 23 ड्रम वनक्षेत्रामधून गायब




सिल्लोड-सोयगाव तालुक्यात येणाऱ्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा वन विभागाच्या हद्दीत तोंडापूर धरणाच्या पाठीमागील ‘राक्सा बीट’ (कक्ष क्र. ५०५ डी) मध्ये १६ जून रोजी आढळलेले घातक रसायनाचे २३ ड्रम अचानक गायब झाले आहेत. या गंभीर प्रकारामुळे वन्यजीव संरक्षक डॉ. संतोष पाटील आणि भूषण कानडजे यांनी थेट वनमंत्र्यांकडे तक्रार करत दोषी वन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. १६ जून रोजी राखीव वनक्षेत्रात २२ ड्रम आणि काही अंतरावर १ असे एकूण २३ ड्रम रसायन सापडले होते. मात्र, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी महसूल, पोलिस किंवा वरिष्ठांना कोणतीही कल्पना न देता हे ड्रम शेजारील शेतकऱ्यांच्या हवाली केले. दोन दिवसांनी थातूरमातूर पंचनामा करताना गुन्ह्यात या ड्रमचा उल्लेखच केला नाही. रासायनिक नमुने तपासण्यासाठी आलेले प्रदूषण मंडळाचे पथक रिकाम्या हाताने परतले. अखेर त्यांनी मातीचे नमुने घेतले आहेत. विषबाधेचा धोका जवळच मोठे धरण असून ६० हजार नागरिक आणि वन्यजीव या पाण्याचा वापर करतात. पावसाळा सुरू झाल्यास हे रसायन वाहून धरणाचे पाणी दूषित होईल व मोठी विषबाधा होऊ शकते. हे ड्रम डोंगरातच कुठे तरी लपवले असण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *