![]()
जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शेंद्रा एमआयडीसी जवळील लिबेर चौकात रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पिकअप चालकाचा ताबा सुटल्याने वाहनाने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या बुलेटला धडक दिली. या अपघातात सय्यद अली सय्यद मंजूर (वय ६१, रा. किराडपुरा, संभाजीनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. दोन म्हशी घेऊन संभाजीनगरहून जालन्याकडे जाणारा पिकअप (एमएच २१ सी ००२७) लिबेर चौकाजवळ आला असता, चालकाचे नियंत्रण सुटले. पिकअप दुभाजक तोडून विरुद्ध बाजूला आला आणि समोरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या बुलेटला (एमएच ०४ जेपी ४०८०) समोरून उडवले. नागरिक व पोलिसांनी गंभीर जखमी सय्यद अली यांना घाटी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी चिकलठाणा ठाण्यात गुन्हा नोंद आहे. पिकअपमधील म्हैस दगावली नियंत्रण सुटलेल्या पिकअपची गती तीव्र होती, बुलेटला चिरडल्यानंतर तिने आणखी एका दुचाकीस धडक दिली, ज्यात दुसरा चालक जखमी झाला. तसेच या अपघातात पिकअपमध्ये असलेली म्हैसही दगावली. तपास चिकलठाणा ठाण्याचे सतीश देवकर, विजयसिंह जारवाल करीत आहेत.
Source link
भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू:शेंद्रा एमआयडीसी जवळील लिबेर चौकामध्ये घडली घटना