Headlines

अहिल्यानगरमध्ये 2 हजारांवर नागरिकांच्या उपस्थितीत शहरात योग दिन साजरा:सावेडी येथील जॉगिंग पार्कमध्ये रंगला योगमय सोहळा




जिल्हा प्रशासन, मनपा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा भारती, विविध योग संस्था आणि एकविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी सकाळी सावेडी येथील जॉगिंग पार्कच्या मैदानावर हा योगमय सोहळा पार पडला. निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते व महापौर ज्योती गाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, क्रीडा भारतीचे चंद्रशेखर कुलकर्णी, अभय महाजन, डॉ. रविंद्र साताळकर, डॉ. हर्षवर्धन तन्वर, गिरीश कुलकर्णी, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते निर्मल थोरात, सुनील जाधव, मनीषा पुंडे, कोमल वाकळे यांच्यासह विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, खेळाडू आणि पालकांसह २ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी उपस्थित राहून सामूहिक योगासने केली. महापौर गाडे म्हणाल्या, प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत शरीरस्वास्थ्याकडे दुर्लक्ष होत असताना, योगामुळे केवळ शरीर निरोगी राहत नाही, तर मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देखील प्राप्त होते. त्यामुळे प्रत्येकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे. निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते म्हणाले, योग ही आरोग्याची गुरुकिल्ली असून निरोगी जीवनासाठी नियमित योगाभ्यास आवश्‍यक आहे. जिल्हावासीयांनी नियमित योग करून आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा. या वेळी त्यांनी उपस्थितांना शारीरिक, मानसिक आणि भावनिक संतुलन राखण्याचा संकल्प करून शपथ दिली. विविध योगासनांचा उत्साहपूर्ण सराव एम.एम.वाय.टी.सी. संस्थेच्या अनुभवी योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सामूहिक योगसत्रात प्रार्थना, सूक्ष्म व्यायाम, विविध योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी क्रीडा भारतीचे वेदपाल तन्वर, सुधीर चपळगावकर, अमोल धोपावकर, कीर्ती धोपावकर, प्रियांका खिंडरे, रंजन तडवी, प्रवीण कोंढावळे, विशाल गर्जे, संतोष वाबळे आदींनी परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *