Headlines

ताणतणाव घालवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेडिटेशन करावे:बबनराव धावणे यांचे आवाहन, इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांनी केला आसनांचा सराव




भारताने योग अभ्यासाच्या रूपाने जगाला एक अनमोल देणगी दिली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव सहन करण्याची शक्ती कमी झाल्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी मनाला शांत करण्यासाठी योगासने करणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनी मानसिक स्थैर्यासाठी नियमित मेडिटेशन (ध्यान) करावे, असे आवाहन माजी क्रीडाशिक्षक बबनराव धावणे यांनी केले. जागतिक योगदिनाचे औचित्य साधून शेवगाव येथील रेसिडेन्शीअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, रेसिडेन्शीअल इंग्लिश मेडीअम स्कूल आणि गुड मॉर्निंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. योगाच्या माध्यमातून माणसाची शारीरिक आणि मानसिक तयारी होते. स्वतः आनंदी राहणे, निरोगी राहणे आणि मन शांत ठेवणे या गोष्टी योगासनांमुळे साध्य होतात. इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी ओंकार, भ्रामरी, अनुलोम-विलोम, वज्रासन आदी आसनांचा अतिशय उत्कृष्टपणे सराव केला. प्राचार्य बालाजी गायकवाड यांनीही आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, धावपळीच्या युगातील ताणतणावाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योग अभ्यास करणे आवश्यक आहे. या योगोत्सवाला उपमुख्याध्यापक हरिभाऊ दरेकर, पर्यवेक्षक महेश शिंदे, योग शिक्षक बबनराव धावणे, भागनाथ काटे, बंडूशेठ लव्हाट, योगगुरू दिलीप मोटकर, तात्यासाहेब लव्हाट, तसेच ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत अमृते, सुनील गोर्डे, अमोल पवार, शिवगंगा कांजवने उपस्थित होते. सूत्रसंचलन बाळासाहेब गव्हाळ यांनी, तर आभार रामनाथ काळे यांनी मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *