Headlines

पाचोडजवळ जांभूळ भरलेले पिकअप पलटी:रस्त्यावर पडलेल्या जांभुळांसाठी नागरिकांची झुंबड




छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जांभूळ वाहतूक करणारे एक पिकअप वाहन पलटी झाले. या अपघातानंतर रस्त्यावर विखुरलेली जांभळे गोळा करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. हा अपघात पाचोडजवळील मुरमा शिवारात पहाटेच्या सुमारास घडला. आंध्र प्रदेशातून खान्देशातील जळगावकडे सुमारे तीन लाख रुपयांहून अधिक किमतीची जांभळे घेऊन जाणारे हे पिकअप वाहन होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ते रस्त्यालगतच्या नाल्यात पलटी झाले. अपघातानंतर वाहनातील मोठ्या प्रमाणातील जांभळे रस्त्यावर विखुरली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेकांनी पिशव्या आणि पोती घेऊन रस्त्यावर पडलेली जांभळे गोळा करण्यास सुरुवात केली. जांभळे लुटण्यासाठी झालेल्या या गर्दीमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *