Headlines

जळगावात विमानतळापेक्षा रेल्वे पार्किंग महाग‎:विमानतळावर कारसाठी 120, रेल्वे स्थानकावर 250 रु. शुल्क‎




जळगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांची लूट ‎‎करण्याचा एक अजब प्रकार समोर आला ‎‎आहे. ज्या किमतीत जळगाव ते मुंबईचे‎ जनरल रेल्वे तिकीट मिळते, त्याच्या दीडपट ‎‎रक्कम जळगावकरांना कार पार्किंगसाठी ‎‎मोजावी लागत आहे. सुविधांच्या बाबतीत ‎‎ठणठणपाळ असलेल्या रेल्वे पार्किंगचे दर ‎‎आलिशान विमानतळाच्या दरांनाही मागे‎ टाकत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या मूक ‎‎संमतीवर आता संताप व्यक्त होत आहे.‎ रेल्वेस्थानकाची अधिकृत पार्किंग‎ चालवण्यासाठी रंजना एंटरप्राइझेस या ‎कंत्राटदार कंपनीला दिलेली आहे. अनेक‎ वर्षांपासून या संस्थेकडे कंत्राट आहे. या‎ठिकाणी 900 दुचाकी लावण्यात येतात. ‎इथे 100 ते 125 दुचाकी लागतील असे‎ शेड आहे. उर्वरित सर्व दुचाकी उन्ह व‎ पावसात उभ्या राहतात. रेल्वेच्या ठिकाणी‎कार पार्किंगची व्यवस्था नाही. दुचाकीला‎ शून्य ते 2 तासांसाठी 5 रुपये, 6 तासांपर्यंत‎10 रुपये, त्यापुढे 12 तासांसाठी 20 रुपये‎व 24 तासांसाठी 35 रुपये आकारले जाते.‎ रेल्वे विभाग ठरवतो दर‎ रेल्वे पार्किंगचे दर हे मुख्य वाणिज्य ‎निरीक्षकांकडून ठरवले जातात.‎ त्याबाबत काही बदल करण्याचा‎ स्टेशनमास्तर यांना अधिकार नसतो.‎ – कौस्तुभ चौधरी, स्टेशनमास्तर‎
रेल्वे स्थानकावर कार पार्कसाठी 250 ‎रुपये द्यावे लागतात. त्यातही 10 ते 15‎ मिनिटे जास्त झाल्यास जादा पैसे‎ मोजावे लागतात. दुचाकीसाठी 5‎ मिनिटे अतिरिक्त झाले तर पुढील 12‎ तासांचे 20 रुपये वसूल केले जातात.‎ वाहनाची सुरक्षितता रामभरोसे तिन्ही पार्किंग मिळून किमान 2000 दुचाकी, 50 कार पार्किंग दररोज होतात. या सर्व वाहनाच्या पार्किंगचे शुल्क कंत्राटदार वसूल करतात. मात्र, वाहनांच्या सुरक्षिततेसाठी शेडची‎ पुरेशी व्यवस्था नाही. रेल्वेच्या मक्तेदाराने तर थेट वाहनांच्या तुटफुटीबाबत बोर्ड लावून जबाबदारी झटकली आहे.‎ रेल्वेसोबत आहे करार‎ रेल्वे प्रशासनासोबत झालेल्या‎ करारानुसारच पार्किंगचे दर ठरवून ‎शुल्क आकारणी करतो. त्याबाबत‎ फलकही लावण्यात आले आहेत.‎- अलताफ शेख, कंत्राटदार,जळगाव शेड पुरेसे नसल्याने शुल्क देऊनही उन्हातच वाहने असतात उभी‎ खान्देश सेंट्रलच्या बाजूने दोन्ही‎बाजूला जय बजरंग पे अँड ‎पार्किंग आणि पे अँड पार्किंग हे‎ दोन खासगी पार्किंग आहेत. दोन्ही‎ पार्किंगच्या ठिकाणी दुचाकीसाठी ‎शून्य ते 12 तासांसाठी 20 रुपये तर‎ 24 तासांसाठी 35 रुपये शुल्काची ‎वसुली वाहन चालकांकडून होते.‎ बजरंग पार्किंगमध्ये कारचे शून्य ‎ते 4 तासांसाठी 25 रुपये आणि 8‎ तासांपर्यंत 50 रुपये, 12 तासांपर्यंत‎ 100 व 24 तासांसाठी 250 रुपये‎ घेतात. पे अँड पार्किंग येथे कार ला‎3 ते 6 तासांच्या वेळेसाठी 50‎ रुपये, 12 तासांपर्यंत 100 रुपये‎ आणि 24 तासांसाठी 200 रुपये‎ शुल्क आकारणी केली जाते.‎‎‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *