![]()
हिंगोली जिल्ह्यात अवघ्या सहा महिन्यांमध्ये आपल्या कर्तव्यदक्षतेची छाप उमटवणारे पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांची नांदेड येथे बदली झाली असून खामगाव येथून अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा हिंगोली जिल्ह्याच्या पोलीस दलाची धुरा सांभाळणार आहेत. हिंगोली जिल्ह्यांमध्ये डिसेंबर महिन्यात रुजू झालेल्या डॉक्टर निलाभ रोहन यांनी अवघ्या सहा महिन्यात आपल्या कार्याची छाप उमटवली होती. जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर आळा घालण्यासाठी त्यांनी विशेष पथके ही स्थापन केली होती या पथकाच्या माध्यमातून जिल्हाभरात छापा सत्र सुरू केले. याशिवाय गुटखा विक्री तसेच अवैध वाळू वाहतुकीवर त्यांच्या काळात अंकुश बसला होता. हिंगोली जिल्हा पोलीस दलात कार्यरत असताना अनेक वेळा त्यांनी कठोर निर्णय घेतले एकाच वेळी पन्नास पेक्षा अधिक गुन्हेगारांना हद्दपार करून जिल्हा बाहेरचा रस्ता दाखवणारे ते पहिलेच पोलिस अधीक्षक ठरले. याशिवाय जिल्ह्यातील कामचुकार पोलीस कर्मचाऱ्यांवरही त्यांनी कारवाई केली. पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये समुपदेशनाने बदल्या करून कर्मचाऱ्यांना हवे त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली त्यामुळे कर्मचाऱ्यांमधूनही समाधान व्यक्त करण्यात आले. दरम्यान आता अचानकपणे त्यांची नांदेडच्या पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश आज धडकले आहेत. त्यांच्या जागेवर आता खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांची हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Source link
हिंगोलीचे पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांची बदली:खामगाव चे अपर पोलीस अधीक्षक लोढा सांभाळणार जिल्ह्याची धुरा