Headlines

पुण्यातील बिल्डरपुत्राच्या हत्या प्रकरणाचा उलगडा:केतनच्या मृत्यूनंतरही सिया शांत दिसल्याने आला संशय




पुण्यातील बिल्डरपुत्र केतन अग्रवालला त्याची भावी पत्नी सिया गोयलने प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने खून केल्याचे उघडकीस आले. तिने त्याला चेतनच्या मदतीने लोहगड किल्ल्यावरून ४०० फूट खोल दरीत ढकलून दिले होते. त्यांना अटक करण्यात आली. सियाच्या सासरच्या मंडळींनी सांगितले की, १८ जून रोजी लोहगड येथून केतनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तो पाहूनही सिया शांत होती. तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ते पाहूनच आमच्या मनातील शंकेची पाल चुकचुकली. सियाचा सीडीआर, १०० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर कट उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सियाचे वडील प्रविण गोयल ड्रायफ्रुट व मसाल्यांचे व्यापारी आहेत. सियाने बीबीए प्रथम वर्षानंतर पुढील शिक्षणाला रामराम ठोकला. आणि पुण्यात स्वत:चा बेकरी व्यवसाय सुरू केला होता. त्यानिमित्ताने तिची चेतनशी ओळख झाली. त्याचेही वडील बाबूलाल चौधरी ड्रायफ्रूट व मसाल्यांचे व्यापारी आहेत. चेतननेही बीबीए शिक्षण बंद केले होते. चेतन व सियाच्या ओळखीचे रुपांतर आधी मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. पण कुटुंबियांनी तिचा विवाह केतन अग्रवालशी निश्चित केला. त्यांचा साखरपुडाही झाला होता. केतन अमेरिकेतून परत आला होता आणि रिअल इस्टेट कंपनीत संचालक होता. नोव्हेंबरमध्ये उदयपूर येथे विवाह सोहळा होणार होता. इंदूरच्या सोनम रघुवंशीनेही केली होती पतीची हत्या मे २०२५ मध्ये इंदूरचा व्यापारी राजा रघुवंशीचा पत्नी सोनमसोबत हनीमुनसाठी मेघालयातील गेला होता. तेथे सोनमने शिलाँग जवळच्या जंगलामध्ये प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली आणि १७ लाखांच्या खंडणीसाठी अपहरणकर्त्यांनी पतीला मारले असा बनाव केला होता. पण सखोल तपासात तो बनाव उघडकीस आला. आता सिया गोयलचे प्रकरणही सोनम रघुवंशीसारखेच दिसत आहे. वाढदिवसाच्या दिवशीच काढायचा होता काटा वाढदिवसापूर्वीच रचला खुनाचा कट सियाचा १९ जून रोजी वाढदिवस होता. म्हणून महाबळेश्वरातील नामांकित हॉटेलात पार्टी आयोजित केली होती. त्याआधीच १४ जून रोजी ती केतनला लोहगडला घेऊन गेली. तेथे तिने त्याला ढकलले. पण तो झुडूपात अडकल्याने वाचले. तेव्हा मला साप दिसला म्हणून मी घाबरले आणि तुला माझा धक्का लागला, असा बनाव तिने केला. केतन होता अनुभवी ट्रेकर केतन नियमित ट्रेकर होता. त्यामुळे तोल जाऊन तो दरीत पडून मृत्यु होईल, या दाव्यावर त्याच्या कुटुंबियांना देखील शंका होती. सिया व केतनमध्ये काही दिवसांपासून वाद होत होते, अशीही माहिती कुटुंबियांना दिली. त्यावरून पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण केले. त्यात चेतन, सियाने खूनाचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. बालीचे प्री-वेडिंग शूटिंग टाळले; पासपोर्ट लपवला जूनच्या पहिल्या आठवड्यात केतनने प्री-वेडिंग शूटसाठी सियाला घेऊन इंडोनेशियातील बाली बेटावर घेऊन जाण्याचे ठरवले. केतनचा पासपोर्ट गहाळ झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ते घरी परतले. परंतु आता सियानेच बालीला न जाण्यासाठी त्याचा पासपोर्ट नष्ट केल्याचे स्पष्ट झाले आहे अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *