Headlines

कपल्ससाठी ‘खास’ व्यवस्था; 49 कॅफेंवर हातोडा:पार्टिशन, काचेला ब्लॅक फिल्म; टीव्ही सेंटर, कॅनॉट, निराला बाजार, उस्मानपुऱ्यातील कॅफे मनपा, पोलिसांनी केले उद्ध्वस्त



शहराच्या गजबजलेल्या भागात तरुणाईला आकर्षित करण्यासाठी काही कॅफेचालकांनी उभारलेले पार्टिशन आणि ब्लॅक फिल्मचे जाळे मनपा व पोलिसांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी (२३ जून) सायंकाळी ४९ कॅफेवर कारवाई करत उद्ध्वस्त केले. नियमांना धाब्यावर बसवून कपल्ससाठी विशेष

.

सायंकाळी सहा वाजता अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी पथकासह वेगवेगळ्या भागात कारवाई सुरू केली. ही कारवाई रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होती. मनपाने ४ स्वतंत्र पथकांमार्फत कारवाई केली. या कारवाईदरम्यान तरुणांना आक्षेपार्ह कृत्ये करण्यासाठी पार्टिशन उभारलेले असल्याचे, खिडक्यांवर ब्लॅक फिल्म बसवल्याचे दिसून आले. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी हातोड्यांनी काचेचे दरवाजे आणि पार्टिशन तोडून जमीनदोस्त केले. ही कारवाई पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

राजकीय नेत्यांचा दबाव झुगारला

या कॅफेंना राजकीय वरदहस्त असून त्यांच्या दबावामुळेच या ठिकाणी कारवाई करण्यास प्रशासन धजावत नव्हते. या कारवाईदरम्यानही अनेक ठिकाणी स्वघोषित नेते आणि मनपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी कारवाई रोखण्यासाठी प्रयत्न केला. मात्र मनपा व पोलिसांनी याला अजिबात जुमानले नाही.

कॅफेमध्ये आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या

ही कारवाई आता यापुढेही सुरूच राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती नागरिकांनी कळवल्यास त्यांचे नाव गोपनीय ठेवून कारवाई करू. या कारवाईदरम्यान आक्षेपार्ह गोष्टी आम्हाला आढळल्या आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करणार आहोत. – संतोष वाहुळे, संनियंत्रण अधिकारी, अतिक्रमण विभाग.

कॅफे चालवण्यासाठी काय आहेत नियम?

१. कॅफेमध्ये पार्टिशन करण्यास सक्त मनाई. २. व्यावसायिक इमारतीमध्ये पारदर्शक काचा असणे आवश्यक. ३. खिडक्यांवर किंवा काचांवर ब्लॅक फिल्म लावण्यास बंदी. ४. नियमापेक्षा जास्त जागा व्यापल्यास कारवाई. ५. व्यवसाय परवाना आणि एफडीएचे नोंदणी प्रमाणपत्र असणे बंधनकारक. ६. सीसीटीव्ही असणे आवश्यक.

सीसीटीव्ही चित्रीकरण तपासणार

काही कॅफेंच्या बाहेर सीसीटीव्ही आहेत. त्यांचा डेटादेखील तपासण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे या ठिकाणी कोण येत होते आणि काय प्रकार चालायचे, याचादेखील उलगडा केला जाणार आहे. विशेष म्हणजे या कॅफेचालकांना कोण संरक्षण देत होते, याचादेखील उलगडा या माध्यमातून होणार आहे. यामध्ये काही नेते, मनपा आणि पोलिस खात्यातील कर्मचारीदेखील अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कारवाई करताना ‘त्यांचा’ नाइलाज

वर्षभरापूर्वी मनपा आणि पोलिसांनी अशीच कारवाई केली होती. मात्र, मोहीम थांबताच या कॅफेचालकांनी पुन्हा तोच धंदा सुरू केला. कॅफेमध्ये अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर पोलिस आयुक्त प्रवीण पवार, मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्यासह अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून कारवाई सुरू केली. वरिष्ठ अधिकारी ग्राउंडवर उतरल्याने कनिष्ठ कर्मचाऱ्यांना नाइलाजाने कारवाई करावी लागली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *