Headlines

मुख्यमंत्री साहेब, हिंदू धर्मातही नास्तिकता मान्य आहे बरं!:तुम्हाला हिंदूत्वाची व्याख्या शिकवणारे सावरकरही नास्तिकच होते – काँग्रेस




वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांचा शिरकाव झाल्याच्या शरद पवारांच्या भूमिकेचे काँग्रेसने जोरदार समर्थन केले आहे. शरद पवारांच्या मताशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. संघ विचारांच्या भोंदू बाबा, तथाकथित स्वयंघोषित आचार्य व विद्वेष पूर्ण विचारधारा पसरवणाऱ्या किर्तनकारांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांना हिंदूत्वाची व्याख्या शिकवणारे सावरकरही नास्तिकच होते, असेही काँग्रेसने या प्रकरणी म्हटले आहे. शरद पवारांनी शासकीय महिला अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित झालेल्या एका स्मरणिकेत एक लेख लिहिला आहे. त्यात वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांनी घुसखोरी केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या भूमिकेवर भाजपने जोरदार टीका केली आहे. हिंदू धर्म व वारकरी संप्रदायाचा कायम द्वेष करणाऱ्या मौलाना शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागला आहे. त्यांना जाळीदार टोपी घालून इफ्तार पार्ट्या झोडताना ते लोक धर्मांध वाटत नाहीत, असे भाजपने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी आपल्या पक्षाची उपरोक्त भूमिका विषद केली आहे. प्रतिगामी घुसखोरांकडून द्वेष पसरवण्याचे काम सचिन सावंत रविवारी एका पोस्टमध्ये म्हणाले, आदरणीय शरद पवार साहेबांच्या मताशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. संघ विचारांच्या भोंदू बाबा, तथाकथित स्वयंघोषित आचार्य आणि विद्वेष पूर्ण विचारधारा पसरविणारे किर्तनकार यांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वारकरी संप्रदायाने भक्तीमार्गाने ईश्वराला सर्वसामान्यांना जोडून दिले व जातीभेद, लिंगभेद, वर्णभेद व धर्मभेद न मानता समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केला, समाजाचे प्रबोधन केले. पण हे घुसखोर समाजात जाणिवपूर्वक द्वेष पसरविण्याचे काम करत आहेत. यांच्यापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. गेली अनेक शतके संतांच्या प्रबोधनात्मक अभंग व इतर साहित्यात घुसखोरी करण्याचा मनुवाद्यांनी प्रयत्न केला त्याचाच हा पुढील भाग आहे. राहता राहिला शरद पवार साहेब नास्तिक आहेत का नाहीत हा प्रश्न तर हिंदू धर्मात नास्तिकता ही मान्य आहे बरं! मुख्यमंत्री साहेब, नाहीतरी हिंदूत्वाची व्याख्या तुम्हाला शिकवणारे सावरकरही नास्तिक होते, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. आत्ता पाहू नेमके काय म्हणाले होते शरद पवार? शरद पवार आपल्या लेखात म्हणाले होते, वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीत आता प्रतिगामी विचारसरणीचे लोक घुसखोरी करत आहेत. वारकरी संप्रदायात 60 टक्के लोक हे बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल अशा पद्धतीने मांडणी करतात. त्यामुळे आम्ही आता यादी करण्यास सुरुवात केली आहे. सध्या साधारण चाळीसएक लोक असे दिसतात की, ते वारकरी संप्रदायात कीर्तन व प्रवचनातून पुरोगाी भूमिका मांडतात. त्यांची अत्यंत गरज आहे. दुर्दैवाने या प्रबोधनाच्या मार्गावर कुठेही महिला दिसत नाहीत. माझ्यावर काही व्यक्तींचा अत्यंत प्रभाव आहे. त्यातील एक म्हणजे माझी आई. त्याकाळी जिल्हा लोक बोर्डात महिला प्रतिनिधीसाठी एक जागा असायची. त्या जागेवरून संपूर्ण जिल्ह्यातून माझी आई निवडून आली होती. तिचे वैशिष्ट्य म्हणजे ती एकही बैठक चुकवायची नाही. अभ्यास करून जायची. त्याकाळी प्रवासाची साधने नसायची. खासगी मोटार सर्व्हिस होती. एसटी नसायची, असे शरद पवार म्हणाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *