![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व काय आहे हे भारतामधील लोकांना माहिती आहे.संजय राऊत तुम्ही पाकिस्तानची चाटुगिरी करू नका, त्यांची प्रवक्तेगिरी करू नका. पाकिस्तानचे उदो उदो करण्याचे काम राऊतांकडून सुरू आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, पाकिस्तानने इराण-अमेरिकेमध्ये दलाली करण्याचे काम केले आहे. हे करण्यापेक्षा तिथल्या समस्याकडे जर त्यांनी लक्ष दिले असते तर साडेचारशे रुपये पेट्रोल-डिझेल झाले नसते. त्यांची काय अवस्था आहे हे राऊतांनी जाऊन बघावे. पाकिस्तानचा उदो उदो करत देशाची बदनामी करण्याचे काम राऊतांनी करू नये. देशाची बदनामी करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय जनता राहणार नाही. मविआचे नेते दाढ्या कुरवळताय नवनाथ बन म्हणाले की, देशात हिंदू कोण आहे आणि औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष कोण आहे हे जनतेने ठरवले आहे. उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लब आणि अफजल खानांच्या दाढ्या कुरवळत आहे.शरद पवार यांना हिंदू धर्माबद्दल किती आदर आहे हे महाराष्ट्राने पाहिले आहे. संजय राऊत, उद्धव ठाकरे हिंदू विरोधी भूमिका घेत आहे हे जनतेला माहिती आहे. उबाठा गट, मविआ हे औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य आहे, तुम्ही हिंदुत्व शिकवू नका. फडणवीसांना शिकार करण्याची गरज नाही नवनाथ बन म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना शिकार करण्याची गरज नाही. उबाठा गटाची शिकार करण्याचे काम जनतेने केले आहे. या शिकारीमध्ये उबाठा गटाला घायळ करत घरी बसवले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिशी जनतेचे आशीर्वाद आहेत. भोंदू बाबा खरातनंतर आता संजूबाबा राऊत ज्या पद्धतीची वायफळ बडबड करताय हे जनता बघते आहे. सरकारने खरातवर कारवाई केली त्याला बेड्या घातणारे हे सरकार आहे. मोदींवर साधला निशाणा आंतरराष्ट्रीय विषयावर बोलताना राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. राऊत म्हणाले की, ज्या देशाला आपण अडाणी म्हणतो, त्या पाकिस्तानने जागतिक भान काय असते, हे दाखवून दिले आहे. इस्लामाबादमध्ये सध्या जे सुरू आहे, त्याकडे संपूर्ण जग बघत आहे. जागतिक पातळीवर पाकिस्तानने महत्त्वाची भूमिका निभावली, तरीही कोणत्याही बॅनरवर पंतप्रधान किंवा इतर नेत्यांचे फोटो वापरलेले नाहीत. अशा प्रसंगी स्वतःची बॅनरबाजी कशी टाळावी, हे त्यांनी मोदींकडून शिकले पाहिजे.
Source link
राऊतांनी पाकिस्तानची चाटुगिरी थांबवावी:अफजल खानाच्या दाढ्या कुरवळणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये– नवनाथ बन