Headlines

करमाळा तालुक्यात जांभळाचा हंगाम जोमात:बाजारात आवक वाढली, हवामान बदलामुळे यंदा मोठी फळधारणा, झाडे फळांनी भरली‎



करमाळा तालुक्यात यंदा जांभूळ झाडांना मोठ्या प्रमाणात फळधारणा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतशिवार, ओढे-नाले परिसर तसेच गावांच्या हद्दीतील अनेक जुनी जांभूळ झाडे फळांनी लगडली असून जांभूळ हंगाम यंदा विशेष गाजताना दिसत आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठांम

.

कृषी जाणकारांच्या मते, गतवर्षी झालेला चांगला पाऊस, जमिनीत टिकून राहिलेला ओलावा, हवामानातील बदल आणि त्यानंतर वाढलेले तापमान यामुळे जांभूळ झाडांच्या वाढीस अनुकूल वातावरण मिळाले. परिणामी यंदा झाडांवर मोठ्या प्रमाणात बहर आणि फळधारणा झाली आहे. सध्या करमाळा तालुक्यात जांभळांचा हंगाम जोमात असून झाडांवरील काळीभोर जांभुळे आणि बाजारातील वाढलेली आवक यामुळे ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान, जांभूळ झाडे भरपूर बहरल्यास दुष्काळ पडतो, अशा आशयाचे संदेश व्हायरल होत आहेत. अनेकांमध्ये चर्चा रंगली असली तरी अशा दाव्यांना कोणताही शास्त्रीय आधार असल्याचे अधिकृत संस्था किंवा तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले नाही. ^जांभूळ पश्चिम घाटातील सहजी उपलब्ध आणि प्राणी, पक्षांसाठी खाद्दोपयोगी प्रजाती आहे. जांभूळ फळांचा हंगाम आणि बहर अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. साठवणीतील, जुन्या जांभळाच्या बियांची उगवण अतिशय कमी होते किंवा होऊच शकत नाही. ^जांभूळ हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ आहे. यात भरपूर अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर असल्याने पचनक्रिया सुधारण्यास, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि रक्तातील साखरेचे नियंत्रण राखण्यास मदत मिळू शकते. जांभळाच्या बियांनाही औषधी महत्त्व आहे. जांभूळ बियांची पूड पारंपरिक पद्धतीने मधुमेह नियंत्रणासाठी उपयोगी मानली जाते. त्यामुळे हंगामात प्रमाणात जांभूळ सेवन करणे आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने बियांचा योग्य वापर करणे आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकते. — डॉ. संजय साळुंके, वाशिंबे ता. करमाळा

तज्ज्ञांच्या सल्ल्याने बियांचा योग्य वापर करणे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *