Headlines

लासूर रेल्वे उड्डाणपुलाचे काम वेळेत करा:धिम्या गतीमुळे अधिकारी-ठेकेदारांवर आमदार प्रशांत बंब संतापले‎




येथील रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक ३४ वरील उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाची आमदार प्रशांत बंब यांनी शुक्रवारी पाहणी केली. गेल्या सहा महिन्यांपासून कासवगतीने सुरू असलेल्या या कामावर आमदार बंब यांनी संताप व्यक्त करत, संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. लासूर रेल्वे क्रॉसिंगवरून दररोज वाहनचालकांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. असे असतानाही संबंधित यंत्रणा मात्र सुस्त असल्याचा संतप्त दावा स्थानिक नागरिकांनी आमदार बंब यांच्याकडे केला होता. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत आ. बंब यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाब विचारला. जनतेचा संयम आता संपत चालला आहे. पुलाच्या कामात आणखी दिरंगाई झाली, तर गाठ माझ्याशी आहे. मी कोणालाही पाठीशी घालणार नाही. काम वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांविरुद्ध स्वतः गुन्हे दाखल करीन, असा थेट आणि कडक इशारा त्यांनी यावेळी दिला. कामाचा वेग तातडीने वाढवून निर्धारित मुदतीत उड्डाणपूल पूर्ण करण्याचे आदेश देताना, जनतेला वेठीस धरण्याचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे बंब यांनी स्पष्ट केले. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *