![]()
तालुक्यातील प्रादेशिक वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पेडकवाडी नियतक्षेत्रातील बिबखेडा येथील राखीव वनकक्ष क्रमांक १३० मध्ये अतिक्रमण केल्याप्रकरणी वनविभागाने कारवाई केली आहे. १ हेक्टर वनक्षेत्रावर ताबा मिळवून ट्रॅक्टरने नांगरणी करत असल्याची गुप्त माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने २८ जुनला तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी भारतीय वन अधिनियम, १९२७ नुसार कारवाई करत अतिक्रमण रोखण्यात आले आणि घटनास्थळावरून ट्रॅक्टर जप्त केला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुभाष कचरू गांगुर्डे व बळीराम श्रावण सोनवणे यांच्याविरुद्ध वनगुन्हा नोंदवण्यात आला आहे. कारवाईदरम्यान जप्त केलेले ट्रॅक्टर वनविभागाने ताब्यात घेऊन मक्रणपूर येथील रोपवाटिकेत जमा केले आहे. ही कारवाई वनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, सहायक वनसंरक्षक विशाल कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. नांगरणी केल्यास वाहने जप्त Ãसध्या पेरणीचा हंगाम सुरू असल्याने वन जमिनीवर अतिक्रमण होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे सर्व वनकर्मचारी सतर्क आहेत. ट्रॅक्टर चालक आणि मालकांनी राखीव वनक्षेत्रात नांगरणी केल्यास वाहने जप्त करून कडक कारवाई केली जाईल. नागरिकांनी कोणत्याही वनगुन्ह्याची माहिती तात्काळ द्यावी, त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल. – शिवाजी टोंपे, वनपरिक्षेत्र अधिकारी, कन्नड
Source link
वनक्षेत्रामध्ये अतिक्रमण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल:ट्रॅक्टर जप्त, कन्नड येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली कारवाई