Headlines

माहुली चोरमध्ये महिलांसाठी अगरबत्ती प्रशिक्षण शिबिर:ग्रामपंचायत आणि बचत गटाकडून उद्योजकतेला प्रोत्साहन




नांदगाव खंडेश्वरजवळील माहुली चोर येथे ग्रामपंचायत कार्यालय आणि महिला बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी उद्योजकता प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आले आहे. अमरावतीच्या स्वयंसिद्ध उद्योजक विकास अभियान मल्टीपर्पज फाउंडेशनचे तज्ज्ञ या शिबिरात महिलांना मार्गदर्शन करत आहेत. या एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरात महिलांना अगरबत्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जात आहे. डॉ. मोनिका उमक आणि नितीन पाटमासे यांनी महिलांना या संदर्भात योग्य मार्गदर्शन केले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी संगीताताई झंजाट होत्या. उपसरपंच राजेंद्र सरोदे, ग्रामपंचायत सदस्य अरविंद गाडेकर, सचिव अरुण रायबोले, तसेच महिला बचत गटाच्या सदस्य व ग्रामपंचायत सदस्य विभा ढगे यांची यावेळी उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी महिलांना उद्योजकतेबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन ग्रामपंचायत सदस्य सुधा जाधव यांनी केले. याप्रसंगी डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा स्मृतिदिन आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंतीही साजरी करण्यात आली. त्यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *