Headlines

डिजिटल शाळेमध्ये एआयद्वारे शिक्षण; प्रवेशासाठी लागली रांग:8 काेटींतून तेलंगणात सरकारी शाळेचा कायापालट




एअर कंडिशन्ड कॅम्पस… ३६ स्मार्ट क्लास… आधुनिक कॉम्प्युटर व सायन्स लॅब… एआयद्वारे शिक्षण इनोव्हेशन रूम… लायब्ररी आणि रीडिंग झोन… स्वच्छ स्वच्छतागृहे… शुद्ध पाणी व डायनिंग हॉल… लिफ्ट… किचन गार्डनच्या माध्यमातून पर्यावरणाचे धडे… इयत्ता २ री ३ रीसाठी खेळ व उपक्रमांवर आधारित शिक्षण… कथा, फोनिक्स, ऑडिओ-व्हिडिओ आणि प्रॅक्टिकल लर्निंगवर भर… हे सर्व अगदी मोफत. तेलंगणात राजधानी हैदराबादपासून १०४ किमी अंतरावर नलगोंडा येथील कोमटिरेड्डी प्रतीक सरकारी शाळेचा पूर्णपणे कायापालट झाला आहे. येथे प्रवेशासाठी पालकांच्या रांगा लागल्या आहेत. तेलंगणाचे रस्ते आणि बांधकाम मंत्री कोमाटिरेड्डी यांनी आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून ८ कोटी रुपये खर्चून या शाळेची पुनर्बांधणी केली आहे. शाळेचे मुख्याध्यापक रामकृष्ण यांनी सांगितले की, शाळेत जागा मर्यादित आहेत. त्यामुळे केवळ ज्यांच्या पालकांनी वेळेत अर्ज केले होते. त्यांच्याच मुलांना प्रवेश मिळाला. १०५ जागा अन् अर्ज तब्बल ३५०० शाळेत १२ शिक्षक व २५० मुले असून आतापर्यंत पालकांनी ३५०० प्रवेश अर्ज नेले आहेत.पैकी २०८४ अर्ज जमा झाले आहेत. मात्र, जागा १०५ केवळ उपलब्ध आहेत. शाळेत शिक्षकांची संख्या वाढवा, असा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे. शाळा: मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारली मंत्री रेड्डी म्हणाले, “माझा १९ वर्षांचा मुलगा प्रतीकचा २०११ मध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्याच्या स्मृती जतन करण्यासाठी मी असा निश्चय केला होता की, मुलाच्या नावाने शाळा उभारायची किंवा एखाद्या शाळेला अशी मदत करायची, जिथे शिक्षणाचा दर्जा उंचावेल.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *