Headlines

पुण्यात दैवीशक्तीच्या नावाखाली भोंदूकडून महिलेचे 5 वर्षे शोषण:50 लाखांना गंडा; स्वारगेट पोलिसांत गुन्हा; कौटुंबिक वादाचा फायदा घेत कृत्य




नाशिकमधील अशोक खरात आणि पुण्यातील ऋषिकेश वैद्य ही भोंदूगिरीची प्रकरणे ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. अंगात दैवीशक्ती असल्याचे भासवून ४३ वर्षीय औदुंबर मनोहर गडदे (रा. तरटगाव, पंढरपूर) या भोंदूने ४२ वर्षीय महिलेवर गेल्या पाच वर्षांपासून वारंवार अत्याचार केला. केवळ शारीरिक शोषणच नाही, तर कौटुंबिक वाद सोडवण्याच्या नावाखाली या भोंदूने महिलेची ५० लाख ५५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूकही केली आहे. तपास आणि कायदेशीर कारवाई फसवणूक केल्याचे लक्षात येताच महिलेने स्वारगेट पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी औदुंबर गडदे याच्याविरुद्ध बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गुन्ह्याची व्याप्ती किती? या प्रकरणात आरोपीने केवळ बलात्कार (कलम ३७६) केला नसून फसवणुकीचे (कलम ४२०) गंभीर गुन्हेही केले आहेत. एक्सप्लेनर – कायदा काय सांगतो? – अंगात दैवीशक्ती असल्याचे सांगून कोणाचीही फसवणूक करणे हा जादूटोणाविरोधी कायद्यानुसार (२०१३) गंभीर गुन्हा आहे. यात कडक कारावासाची तरतूद आहे.
– अशा वेळी काय करावे?
कोणी व्यक्ती दैवी चमत्काराचा दावा करून पैसे किंवा शारीरिक सुखाची मागणी करत असल्यास तत्काळ पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *