Headlines

Temples and mosques in Ahmedabad follow the ‘religion of protecting the environment’


  • Marathi News
  • National
  • Temples And Mosques In Ahmedabad Follow The ‘religion Of Protecting The Environment’

अल्पेश भट्ट | अहमदाबाद39 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक
धार्मिक स्थळांनी आपली वीज स्वतः तयार करावी, असा प्रयत्न आहे. - Divya Marathi

धार्मिक स्थळांनी आपली वीज स्वतः तयार करावी, असा प्रयत्न आहे.

गुजरातच्या अहमदाबादमधील मंदिरे, मशिदी आणि जैन मंदिरे आता सूर्याच्या प्रकाशाने उजळून निघत आहेत. अहमदाबाद महानगरपालिकेने शहरातील ११४ प्रमुख धार्मिक स्थळांना ‘ग्रीन एनर्जी हब’मध्ये रूपांतरित केले आहे. यामुळे नागरिक आता कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या गरजेबाबत जागरूक होऊ लागले आहेत. पालिकेने सौर पॅनेल बसवण्यासाठी धार्मिक स्थळांची निवड केली. कारण येथे लोकांची ये-जा मोठ्या प्रमाणावर असते. ईश्वराचा दरबार सौर ऊर्जेने उजळल्याचे पाहून भाविक स्वतःही सौर ऊर्जा वापरण्यासाठी प्रेरित होतील, अशी पालिकेची धारणा आहे.या ‘हरित क्रांती’मध्ये शहरातील सर्व वर्गांनी सहभागी झाले. यात ८१ मंदिरे, १७ जैन मंदिरे व ५ मशिदींत सौर पॅनेल बसवले.एकूण २५५ संस्थांनी अर्ज केला आहे. ७ हून अधिक ठिकाणी काम अजूनही सुरू आहे.

अहमदाबाद महानगरपालिकेने ३.९ कोटी रुपये खर्चून ११४ धार्मिक स्थळांवर सौर पॅनेल लावले. यातून १०७१.४० केव्ही वीज निर्माण होत आहे. यामुळे वर्षाला ६७ लाख रुपयांच्या वीज बिलाची बचत होणार आहे. घाटलोडिया येथील नीलकंठ महादेव मंदिराचे विश्वस्त पी. एस. पटेल म्हणाले, पूर्वी विजेचे बिल ५० हजार येत होते. आता निम्म्यावर आले .वाचलेले हे पैसे मंदिराच्या वैद्यकीय सेवांमध्ये वापरले जातील.

६७ लाखांचे वीज बिल बचत; पैसा सेवाकार्यात वापरणार

अहमदाबाद शहराला ‘ग्रीन एनर्जी’च्या दिशेने नेण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आम्ही ही योजना सुरू केली होती. पुढच्या वर्षापर्यंत पालिकेची कार्यालये आणि इतर विभागांना लागणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी ४२ टक्के गरज ही हरित ऊर्जेतूनच पूर्ण केली जाईल. मंदिरांमध्ये वर्दळ सर्वाधिक असते, म्हणूनच आम्ही तिथे सर्वात आधी सौर पॅनेल लावले. जेणेकरून येणाऱ्या भाविकांना स्वच्छ – हरित ऊर्जेचे महत्त्व समजेल .ते पर्यावरणाप्रती जागरूक होतील.

-जयेश उपाध्याय, उपायुक्त मनपा, अहमदाबाद.

“कामेश्वर महादेव मंदिरातील पॅनेल पाहून मी माझ्या घरी सौर पॅनेल लावले. यामुळे दरमहा २५०० ते ३,००० रुपयांच्या वीज बिलाची बचत झाली.”

-नटुभाई पटेल (विश्वस्त, कामेश्वर महादेव)

“मंदिरातील विद्युत उपकरणे सौर ऊर्जेवर चालतात. विजेचे बिलही कमी झाले आहे. हे पाहूनच मी आता माझ्या घराच्या छतावरही सौर पॅनेल लावून घेणार आहे.”

-पीयूष ठाकुर (निकोल)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *