![]()
प्रतिनिधी | ढोरकीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोणगाव येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात नुकतीच साजरी झाली. सहशिक्षक सुग्रीव मुंडे यांनी विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. त्यांच्या कार्याचा गौरव केला. शिक्षक सतीश वैद्य, अन्नदाते, रुळे, आडकर, पडघन यांनी मनोगत व्यक्त केले. स्त्री शिक्षण, अंधश्रद्धा, कर्मकांड, जुलमी व्यवस्थेविरुद्ध फुले यांनी समाजात जागृती केली. प्रबोधन केले. शेतकऱ्यांविषयी शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिले. शेतकऱ्यांच्या व्यथा जगासमोर मांडल्या. मुख्याध्यापक रमेश मुळे यांनी अध्यक्षीय भाषण केले. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा फुले होते, असे त्यांनी सांगितले. शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा फुले यांनी लिहिला, असेही त्यांनी सांगितले. फुले यांनी पत्नीला शिकवले. स्त्री शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळेच आज स्त्री समाजात सन्मानाने उभी राहते, सन्मानाने जगते, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन संजय दिलवाले यांनी केले. मधुकर आडे यांनी आभार मानले. डोणगाव येथे महात्मा फुले यांना अभिवादन करताना शिक्षक आणि ग्रामस्थ.
Source link
डोणगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी:क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती