Headlines

Sachin Ahir Resigns; Ambadas Danve Reveals Message


विधान परिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत अनपेक्षित खेळी करत ठाकरे गटाला (UBT) मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे आमदार आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सचिन अहिर यांनी महायुतीकडून उपसभापतीपदाचा उमेदवारी अर्ज दाखल के

.

सचिन अहिरांचे राजीनामा पत्र

महायुतीकडून उपसभापतीपदाचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सचिन अहिर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक पत्र लिहिले. या पत्रातून त्यांनी पक्षाशी कोणतीही कटुता न ठेवता आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. अहिर यांनी ‘भारतीय कामगार सेने’च्या सरचिटणीसपदाचा आणि ‘बृहन्मुंबई बेस्ट कामगार सेने’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

“आपण माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि विविध पदांवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे मी माझ्या सर्व पदांचा राजीनामा देत आहे. पक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या सदैव शुभेच्छा राहतील,” असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

रात्री ९ पर्यंत सोबत होतो… अंबादास दानवेंचा खुलासा

सचिन अहिर यांच्या या अचानक बंडामुळे ठाकरे गटाचे नेतेही चक्रावले आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर धक्कादायक खुलासा केला. “सचिनभाऊ काल रात्री ९ वाजेपर्यंत आमच्यासोबत होते. आम्ही एकत्र बाहेर पडलो. सकाळी त्यांनी अचानक असा निर्णय घेतला. आता त्यावर काय बोलणार आणि काय करू शकतो?” अशी हतबलता दानवे यांनी व्यक्त केली.

‘सर्व्हायव्हलसाठी निर्णय…’; सचिन अहिरांचा दानवेंना मेसेज

बंड करण्यापूर्वी सचिन अहिर यांनी अंबादास दानवे यांना एक वैयक्तिक इंग्रजी मेसेज पाठवला होता. तो मेसेज दानवे यांनी माध्यमांना वाचून दाखवला. “मला एक राजकीय निर्णय घ्यावा लागला, जो माझ्यासाठी खूप कठीण होता, पण माझ्या अस्तित्वासाठी (Survival) तो गरजेचा होता. मला राजकीय पार्श्वभूमी नाही. माझे काम आणि तुमचा पाठिंबा हीच माझी ताकद आहे. सभागृहातील मित्रांची आठवण येईल.” दानवे यांनी स्पष्ट केले की, या मेसेजपलीकडे त्यांना कोणतीही अधिक माहिती नाही.

एकनाथ शिंदेंचे धक्कातंत्र आणि उदय सामंतांचा दावा

विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी कृपाल तुमाने आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ऐनवेळी सचिन अहिर यांचा अर्ज भरण्यात आला. मंत्री उदय सामंत यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “सचिन अहिर यांनी शिंदेंचा विचार स्वीकारला आहे. ते अनुभवी नेते आहेत. त्यांच्या आमदारकीसह सर्व कायदेशीर बाबी तपासूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.” महायुतीकडून सचिन अहिर अधिकृत उमेदवार झाले असून, त्यांच्या विरोधात ठाकरे गटाने अभ्यंकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

वरळीत आदित्य ठाकरेंना आव्हान? दानवेंनी फेटाळला दावा

सचिन अहिर यांच्याकडे कामगार संघटनांचे मोठे जाळे आहे आणि त्यांचा वरळी मतदारसंघात मोठा दबदबा आहे. त्यांच्या जाण्याने आगामी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्यासमोर आव्हान निर्माण होईल का? यावर अंबादास दानवे यांनी स्पष्टीकरण दिले. “वरळीत कोणतेही आव्हान निर्माण होणार नाही. तिथे शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांनी यापूर्वीच सचिन अहिर यांचा पराभव केला होता. त्यामुळे वरळीबाबतच्या अशा चर्चा निरर्थक आहेत,” असा दावा दानवे यांनी केला. गेल्या आठवड्यात ठाकरे गटातील 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत गेले होते. त्यानंतर अवघ्या 8 दिवसांत सचिन अहिर यांच्या रूपाने ठाकरेंचा आणखी एक विश्वासू मोहरा गळाला लागल्याने ठाकरे गटाला हा सलग दुसरा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. ठाकरे गटातील आणखी काही आमदार संपर्कात असल्याच्या दाव्यावर मात्र अंबादास दानवे यांनी बोलणे टाळले आहे. आता विधान परिषदेत उपसभापती कोण होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातमी वाचा..

‘ऑपरेशन टायगर 3.0’ सुरू:3 नावं चर्चेत ठेवून शिंदेंनी फोडला ठाकरेंचा विश्वासू मोहरा; सचिन अहिर शिंदे गटात, जाणून घ्या इनसाइड स्टोरी

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. ठाकरे गटाचे (UBT) 6 खासदार फोडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता आपला मोर्चा आमदारांकडे वळवला आहे. शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर 3.0’ची सुरुवात झाली असून, विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिंदेंनी ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आणि आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे सचिन अहिर यांनी आज अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, चंद्रकांत पाटील आणि नीलम गोऱ्हे उपस्थित होते. या एका घटनेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, हे नेमके कसे घडले? याचीच चर्चा सगळीकडे सुरू आहे. सविस्तर वाचा

ठाकरे गटाला मुंबईत सर्वात मोठा झटका:आमदार सचिन अहिर यांना शिंदे गटाकडून विधान परिषद उपसभापतीपदाची उमेदवारी

विधान परिषद उपसभापतीपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेतील उपसभापतीपदासाठी सचिन अहिर अर्ज भरताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे देखील उपस्थित होते. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *