![]()
हिंगोली शहरातील कपडागल्ली भागातील फटाका गोदामातील आग प्रकरणात हिंगोली पालिकेच्या अग्नीशमनदलातील कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान आज पहाटे मृत्यू झाला आहे. या घटनेत मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. तर इतर 10 जखमींवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हिंगोली शहरातील कपडागल्ली भागातील गोपाल बासटवार याच्या घरातील गोदामात फटाके साठवून ठेवण्यात आले होते. या गोदामाला सोमवारी ता.५ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भिषण आग लागली होती. या आगीमध्ये दोघांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर इतर 11 जण भाजल्या गेले. या जखमींना लातुर, छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये पालिकेच्या अग्नीशमनदलातील तीन कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यांच्यावर हिंगोली येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातुर येथे हलण्यिात आले होते. दरम्यान, लातुर येथील रुग्णालयात उपचार सुरु असतांना पालिकेचे अग्नीशमनदलाचे कर्मचारी दिलीप दोडके (50) यांचा आज पहाटे उपचार सुरु असतांना मृ्त्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेतील मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. तर इतर १० जणांवर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून 24 तास लक्ष ठेवले जात असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले. दरम्यान, हिंगोली पालिके्च्या अग्नीशमनदलातील अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक कर्मचारी म्हणून दिलीप यांची ओळख होती. त्यांच्या मृत्यूने पालिका प्रशासनावर शोककळा पसरली आहे. मयत दिलीप यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार असल्याचे पालिकेच्या सुत्रांनी सांगितले. मयत दिलीप यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. हेही वाचा.. हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग, 2 ठार:7 जण भाजले, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू हिंगोली शहरातील कपडागल्ली परिसरात फटाक्यांच्या गोदामाला सोमवारी (5 ऑक्टोबर) रात्री पावणेआठच्या सुमारास भीषण आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा साठा असल्याने आगीसोबत जोरदार स्फोट होऊ लागले. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण भाजल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी हिंगोलीतील लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आग विझविताना फटाक्यांच्या स्फोटामुळे अग्निशमन दलाचे वाहनही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सविस्तर वाचा
Source link
हिंगोलीच्या फटाका गोदामातील आगीत आणखी एकाचा मृत्यू:अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, मृतांची संख्या 3 वर