Headlines

परिसरात दहशत:पट्टेरी वाघाकडून हल्ल्याचा शेतकऱ्याचा दावा; वन विभाग म्हणतो, ठसे तपासणार




बागलाण तालुक्यातील जायखेड्यातील मेळवण शिवारात सोमवारी (दि. ५) रात्री वन्यप्राण्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली. लाडे कुटुंबाने पट्टेरी वाघाने आपल्यावर चाल केल्याचा दावा केला असून, त्याच रात्री यशवंत चिंतामण शेवाळे यांच्या गोठ्यात दोन बकरे व एका वासरावर हल्ला झाला. मात्र, नाशिक जिल्ह्यात वाघाच्या अस्तित्वाची कोणतीही नोंद नसल्याने हल्ला करणारा प्राणी नेमका पट्टेरी वाघ आहे की बिबट्या, याचा वन विभागाकडून तपास सुरू आहे. घटनास्थळी आढळलेले पायांचे ठसे, फोटो व इतर पुराव्यांच्या आधारे प्राण्याची ओळख पटवली जाणार आहे. सुभाष हरी लाडे यांच्या शेतात सोमवारी रात्री ८ वाजता लाडे कुटुंबीय घराबाहेर बसले होते. अचानक भिंतीच्या आड दबा धरलेल्या वन्यप्राण्याने डरकाळी फोडत त्यांच्यावर चाल केली. आरडाओरड झाल्याने प्राणी मागे हटला. चंद्रकांत लाडे, आबा लाडे व भैय्या अहिरे यांनी पाहणी केली असता दोन बछड्यांसह पट्टेरी वाघ त्यांना दिसला, तसेच पायांचे ठसेही आढळले. वन विभागाने वन्यप्राण्याचा बंदोबस्त करावा, महावितरणने दिवसा वीज द्यावी, या मागण्या मान्य न झाल्यास संबंधित कार्यालयांवर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. पंचनामा : वन कर्मचाऱ्यांनी चंद्रकांत लाडे यांच्या शेताची पाहणी करून पंचनामा केला. पुरावे जमा : पावलांच्या ठशांचे फोटो व नमुने घेण्यात आले असून, त्यांची तपासणी सुरू आहे. पिंजरा लावणार : परिसरात लोखंडी पिंजरा लावून प्राणी जेरबंद करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. ओळख स्पष्ट होणार : प्राणी वाघ आहे की बिबट्या, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *