![]()
पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आमदार रोहित पवार गेल्या सहा दिवसांपासून एस. एम. जोशी पुलाजवळ विद्यार्थ्यांसोबत ठिय्या आंदोलन करत आहेत. दिवस-रात्र आंदोलनस्थळी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आवाज उठवत असल्याने त्यांच्या आंदोलनाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून त्यांच्या आंदोलनावर टीका होत असतानाच आता रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनी मुलाच्या भूमिकेला पाठिंबा देणारे भावनिक पत्र लिहिले आहे. ‘तुझ्या तोंडात असणारा सोन्याचा चमचा शोधतोय’ राजेंद्र पवार यांनी पत्राची सुरुवात रोहितसोबत एमपीएससी आंदोलनात रस्त्यावर झोपल्याचा उल्लेख करत केली आहे. विरोधक सातत्याने रोहित पवार यांच्या तोंडात सोन्याचा चमचा असल्याची टीका करत असल्याचा संदर्भ देत, ‘तुझ्या तोंडात असणारा सोन्याचा चमचा शोधतोय’, असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या कुटुंबाचा संघर्ष आणि सामाजिक कामाचा प्रवास सांगत त्यांनी रोहितला राजकारणातील संघर्षासाठी तयार राहण्याचा संदेश दिला आहे. कुटुंबाच्या संघर्षाचा प्रवास मांडला पत्रात राजेंद्र पवार यांनी आपले वडील आप्पासाहेब पवार यांच्या संघर्षाचा उल्लेख केला आहे. १९५४ मध्ये ११० रुपये पगारावर नोकरीला सुरुवात करून त्यांनी पुढील काळात शेतकऱ्यांसाठी सामाजिक काम केल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण अर्थव्यवस्थेत दुग्धव्यवसायाचे महत्त्व वाढवणे, ठिबक सिंचनाचा प्रसार आणि शेतकऱ्यांच्या जोडधंद्यांसाठी काम करणे, अशा विविध उपक्रमांचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. राजेंद्र पवार यांनी लिहिलेले संपूर्ण पत्र जसेच्या तसे… प्रिय रोहित,
परवा #MPSC च्या चालू आंदोलनात तुझ्यासोबत रस्त्यावर झोपलो.तुझा संघर्ष व कमिटमेंट असूनही विरोधक सतत म्हणत असलेला तुझ्या तोंडात असणारा सोन्याचा चमचा शोधू लागलो.१९५४ ला ११० रुपये पगारावर माझे वडील आप्पासाहेब पवार नोकरीला लागले.२५ वर्षे नोकरी, उरलेली २५ वर्षे शेतकऱ्यांसाठी सामाजिक काम.महाराष्ट्राला क्रॉसब्रीड गाईंची ओळख करून देऊन आजची ग्रामीण अर्थव्यवस्था दुधामुळे बदलली,१९८० ला ड्रिपचा प्रसार करून प्रथम पाणी बचतीचा मार्ग दाखवला. शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या जोडधंद्यांसाठी काम केले,केंद्रसरकारने पद्मश्री दिली. शेवटपर्यंत सामाजिक काम करत असतानाही राजकारणी भावासाठी राजकीय मदत “थॅंकलेस जॉब” असला तरी करत राहिले. तुझा बाप १९७८ साली अवघे ५०० डॉलर घेऊन अमेरिकेला संघर्षातूनच शिक्षण घेण्यास गेला.तिथल्या झगमगाटीतील सोन्याचा चमचा न पाहता महाराष्ट्रातील स्वतःच्या शेतीत आला.शेती ही आनंद व संघर्षाचे मिश्रण आहे,हे करत एक नावाजलेली संस्था सामाजिक भावनेतून चालवत असतानाच मुरघास,कृषिक #Contract_Farming_in_Poultry व अनेक उपक्रमाची ओळख शेतकर्यांना करून देत आहे. तुझे कॉलेज संपल्यानंतर तू एकटा नोकरी न करता हजारो ग्रामीण तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत तू राजकारणात येण्यापूर्वी आपण स्वत:ची इंडस्ट्री उभी केली. लहानपणी तुला भारी खेळणी नव्हती म्हणून तू गड्यांची पोरं घेऊन मासे,खेकडे पकडायला ओढ्याने जायचास.ते धरताना बिळ सापाचे का खेकड्याचे याचा विचार न करता त्यात हात घालायचास,तुझी हात घालण्याची ही धाडसी सवय त्यामुळेच तयार झाली असावी.पण तू आता राजकारणात आहेस, राजकारणातील एखादा विषारी साप जर कधी डसला तर विष पचवायची तयारी ठेव,आणि त्याचे दात उपसायची हिम्मतही! इतिहासात आणि आताही अनेक बापांना रडता आले नाही आणि काळजीही करता येत नाही.उभारणीच्या संघर्षात वेळ गेल्यामुळे लहानपणी खेळवताही आले नाही पण आता तुझ्या पाठीशी आहे. “लढ,संघर्ष अटळ आहे,ना तुझा बाप राजकारणात होता ना तुझ्या बापाचे मोठे राजकारण आहे!” त्यामुळे तुझा सोन्याचा चमचा तुला मिळणारही नाही पण स्वतःसाठी राजकारण न करता हजारो तरुण पिढ्यांचे आणि गोरगरिबांचे सोने कर. तुझा पाठीराखा बाप
राजेंद्र पवार ——————– ही बातमी पण वाचा.. MPSC अध्यक्ष भीमनवारांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवला:रोहित पवारांचा दावा, म्हणाले- विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आता इगोचा खेळ बनला पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेले सत्याग्रह आंदोलन आता अधिकच आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या आंदोलनात एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘भीमनवार यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असून, आता हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या हिताचा न राहता केवळ मुख्यमंत्र्यांच्या ‘इगो’चा खेळ बनला आहे,’ असा थेट आरोप त्यांनी केला आहे. सविस्तर वाचा
Source link
राजकारणातील विषारी साप डसला तरी विष पचव:रोहित पवारांसाठी वडिलांचे भावनिक पत्र चर्चेत