![]()
राज्यात मान्सूनने रौद्ररूप धारण केले असून अनेक भागांत पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, १ जुलैपासून पुढील ८ दिवस राज्यात अतिमुसळधार पावसाचा मोठा इशारा (Red/Orange Alert) जारी केला आहे. कोकण, मुंबईसह राज्यातील तब्बल २९ जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली असून, शेतातून घरी परतत असताना ओढ्याला आलेल्या पुरात एक ६५ वर्षीय शेतकरी महिला वाहून गेल्याची धक्कादायक माहिती आहे. पुढील ८ दिवस धोक्याचे; आजपासून पाऊस आणखी कोसळणार! जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दाखल झालेला मान्सून आता जुलैच्या सुरुवातीलाच अधिक तीव्र होणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १ जुलै म्हणजेच आजपासूनच पावसाचा जोर प्रचंड वाढणार आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असून सकाळीही पावसाची संततधार सुरूच आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरात दमदार हजेरीमुळे सखल भागांत पाणी साचले असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. परभणीत ओढ्याला पूर; शेतकरी महिला वाहून गेली
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार परिसरात सायंकाळच्या सुमारास झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे गावाशेजारील ओढ्याला अचानक मोठा पूर आला. दुर्दैवाने, शेतातील काम संपवून गावाकडे परतत असलेली एक या शेतकरी महिला या पुराच्या पाण्यात वाहून गेली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गावकऱ्यांच्या मदतीने सध्या त्यांचा शोध घेतला जात आहे. शेतकऱ्यांना दिलासा, पण सतर्कतेचे आवाहन
मुंबईतील कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, अंधेरी आणि गोरेगाव या भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. तर दुसरीकडे पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना मोठा आधार मिळाला असून बळीराजा सुखावला आहे. मात्र, आजही अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि विशेषतः नदी-ओढ्याकाठच्या लोकांनी सुरक्षित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अहिल्यानगर: जूनमध्ये हवामान विभागाचे 23 ‘येलो अलर्ट’ ढगातच ‘विरले’ “एल निनो”च्या पार्श्वभूमीवर जूनमहिन्यात सरासरीच्या ४२ मिमीपावसाची तूट नोंदवली गेली. जूनमध्ये हवामान विभागानेजिल्ह्यात पावसाचे २३ दिवस‘येलो अलर्ट’ जारी केले, मात्र तीन ते चार दिवस तुरळक पाऊस वगळता हे अलर्ट ढगातच विरले. कारण २३ दिवसांत सरासरी १०८ मिमी पावसाच्या तुलनेत ६६ मिमी पाऊस झाला. आता हवामान विभागाने पुढचे ३ दिवस पुन्हा‘येलो अलर्ट” जारी केला आहे. यंदा मे महिन्यात तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशावर गेला. मे महिन्याच्या शेवटच्या ४ दिवसांत मात्र ढगाळ वातावरण निर्माण होऊ लागले होते. त्यामुळे १ जूनपासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा होती. १ जूनपासून भारतीयहवामान विभागाचे दरवर्षी प्रमाणेपावसाचे अंदाज सुरू झाले होते.पण तुरळक वगळता पावसाने दमदार हजेरी लावली नाही. हे ही वाचा.. MP-बिहारमध्ये वीज पडून 8 जणांचा मृत्यू:उत्तराखंडमध्ये राफ्टिंगवर बंदी; IMD चा जुलैमध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज मध्य प्रदेशात मान्सून सक्रिय होताच वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढला आहे. हरदा आणि खरगोनमध्ये वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाला, तर बैतूलमध्ये एकाच कुटुंबातील चार जण जखमी झालेत. चंपा नदीला आलेल्या पुरात दुचाकीसह दोन तरुण वाहून गेले. बिहारमध्येही वीज पडून 5 जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे मंगळवारी सायंकाळी 4 वाजता पिकनिकसाठी गेलेले 3 जण पावसाळी नाल्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. सविस्तर वाचा
Source link
महाराष्ट्रात पुढचे 8 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा:मुंबई-कोकणासह 29 जिल्ह्यांना अलर्ट, परभणीत ओढ्याच्या पुरात महिला वाहून गेली