Headlines

पुष्पगुच्छ, गुलाबपुष्प, मिठाई देत प्रवेशोत्सव:लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या शाळांना भेटी




महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी, मंगळवारी ३० जून रोजी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. शाळांमधील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांची उपस्थिती, मूलभूत सुविधा, अध्यापनाची तयारी तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी शहरातील विविध महानगरपालिका शाळांना नियोजनबद्ध भेटी दिल्या. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात अग्रेसर राहण्याचा प्रेरणादायी असा संदेश दिला. यावेळी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, गुलाबपुष्प, मिठाई तसेच शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे, मन लावून शिक्षण घेण्याचे, स्वच्छता राखण्याचे तसेच शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले. शिक्षकांशी संवाद साधून अध्यापनाची तयारी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम, डिजिटल शिक्षण, वाचन संस्कृती तसेच शाळेतील मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. मनपा शिक्षण विभागाने तयार केलेल्या भेट नियोजनानुसार शहरातील मराठी, हिंदी, प्राथमिक, उच्च प्राथमिक, मुला-मुलींच्या तसेच माध्यमिक शाळांमध्ये सकाळपासून सायंकाळपर्यंत भेटी पार पडल्या. प्रत्येक अधिकाऱ्याला व लोकप्रतिनिधीला विशिष्ट शाळा व वेळ निश्चित करून देण्यात आली होती. त्यामुळे सर्व शाळांमध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहिली. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले. शिक्षण विभागाच्या या उपक्रमामुळे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महानगरपालिका शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता उंचावणे, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविणे, पालकांचा विश्वास दृढ करणे तसेच शाळांचा सर्वांगीण विकास साधणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात प्रशासन, लोकप्रतिनिधी, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून प्रेरणादायी वातावरणात झाली. महानगरपालिका शाळांना अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण व विद्यार्थी-केंद्रित बनविण्याचा संकल्प यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित करण्यात आला. या विशेष उपक्रमात जिल्हाधिकारी आशिष येरेकर, आयुक्त वर्षा लड्डा, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक संचालक, नगररचना अधिकारी सागर वानखडे, मुख्यलेखाधिकारी श्यामसुंदर देव, शहर अभियंता रविंद्र पवार, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, भूषण पुसतकर, नितीन बोबडे, धनंजय शिंदे, विवेक देशमुख, उपअभियंते आशिष अवसरे, सुहास चव्हाण, श्रीरंग तायडे, एस. एस. टोपरे, सहाय्यक अभियंता राजेश आगरकर, शाखा अभियंता एस. एस. तिनखेडे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. विजय शिंदे व डॉ. विकास गावंडे, अधिव्याख्याता डॉ. दिपक चांदूरे, वर्षा मोरे, शाळा निरीक्षक वहीद खान व मो. जावेद, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंकजकुमार सपकाळ, केंद्र समन्वयक नासीर हुसेन व मो. इमरान नबी, विषय साधन व्यक्ती काजी निजामुद्दीन, संजय बेलसरे, शुभांगी सुने, सुषमा दुधे व योगेश राणे यांनी विविध शाळांमध्ये भेटी देऊन शैक्षणिक कामकाजाची पाहणी केली. तसेच लोकप्रतिनिधींकडूनही मोठ्या उत्साहात शाळा भेटी घेण्यात आल्या. महापौर श्रीचंद तेजवानी, खा. डॉ. अनिल बोंडे, आ. रवी राणा, उपमहापौर सचिन भेंडे, सभागृह नेता चेतन गावंडे, विरोधी पक्षनेता विलास इंगोले, गटनेता नाना आमले, नगरसेवक बबलू शेखावत, शेख हमीद शेख वाहेद, डॉ. राजेंद्र तायडे, झोन सभापती माधुरी ठाकरे, स्वाती कुलकर्णी, इस्माईल कासम लालुवाले, किशोर जाधव, शिक्षण समिती सभापती अॅड. प्रीती रेवणे, उपसभापती वंदना मडघे, शहर सुधार समिती सभापती राधा कुरील, उपसभापती सुमती ढोके, महिला व बाल कल्याण समिती सभापती ममता आवारे, उपसभापती लता देशमुख, विधी समिती सभापती नेहा लुल्ला, उपसभापती डॉ. मधुरा काहाळे यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील महानगरपालिका शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रवेशोत्सवादरम्यान विविध भेटवस्तू देण्यात आल्या. यात पेन, पेन्सिल, इरेजर, नोटबुक, वही, स्कूल बॅग, पाण्याच्या बाटल्या, सामान ठेवण्याचे पाऊच अशा आवश्यक शालेय साहित्यांचा समावेश होता. मनपाच्या शिक्षण समितीद्वारे प्रायोजकांच्या माध्यमातून ही सोय करण्यात आली. हे विशेष. तसेच गरजू व गरीब विद्यार्थ्यांना सायकल देण्यात आली. शाळेत स्कूल व्हॅनने मोफत येण्या-जाण्याची सोयही करण्यात आली. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना विविध भेटवस्तू



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *