![]()
तालुक्यातील पोही येथे जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कमीत कमी सुविधांमध्ये जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन, संघर्षाचे धडे, जिद्द आणि चिकाटीचे बळ आणि त्यातून जीवनाचा कायापालट करण्याची धडपड, सहनशीलता याचे पाया
.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त संपूर्ण ३० जून रोजी शाळांचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी खुले झाले. शासनाच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला “शाळा प्रवेश उत्सव’ पोही येथे जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत खा. धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
शाळेत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार लोखंडे, गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, सहकार नेते डॉ. अमित कावरे, माजी सभापती श्याम खंडारे, गणेश गोतमारे, खरतरकर, जिल्हा शिक्षणाधिकारी झापे, पारधी, गटशिक्षणाधिकारी वैशाली रामटेके, सुषमा लांडे, तालुका शिक्षण समन्वय समिती सदस्य बंडूभाऊ डाखोरे, सरपंच किशोर नाईक, उपसरपंच डॉ. भोसले, पप्पू मुळे आदी उपस्थित होते. महोत्सवाचे आयोजनासाठी मुख्याध्यापक अभिजित देशमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सरपंच किशोर नाईक तसेच ग्रामस्थांचेही मोलाचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन आदर्श शिक्षक मोहम्मद अली यांनी केले.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांबद्दल पालकांमध्ये विश्वास व आत्मीयता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात शाळेत प्रवेश मिळावा आणि शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण तयार व्हावे, या उद्देशाने शासनाच्यावतीने उपक्रम राबवण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके, दप्तरांचे वितरण करण्यात आले. प्रथमच शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करून त्यांना दिंडीच्या स्वरूपात वाजतगाजत शाळेत आणण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या ११ चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचे औक्षण करून त्यांना दिंडीत सहभागी करण्यात आले.