Headlines

मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यास विरोध:फेरतपासणीची मागणी, जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे




ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, मराठा समाजाला दिलेल्या ओबीसी प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी सकल ओबीसी समाज बुधवारी रस्त्यावर उतरला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत शासनाने नियुक्त केलेली समिती बरखास्त करण्याची मागणी केली. ओबीसींनी ओबीसींनाच मतदानाचे आवाहन आंदोलनादरम्यान करण्यात आले. मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाही देण्यात आल्या. ओबीसींच्या आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी विविध स्तरांवर बैठका, सभा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी ओबीसी जनमोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पडली होती. ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला होता. दरम्यान याच अनुषंगाने १ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ओबीसी अधिकार हक्क व संरक्षण परिषदेतर्फे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात अ. भा. सावता परिषदेचे कल्याणकाका आखाडे, धोबी समाज आरक्षण कृती समितीचे अनिल शिंदे, माजी आमदार हरिभाऊ भदे, प्रा. डॉ. संतोष हुशे, कुणबी समाजाचे उर्वरित पान ४ इतर मागासवर्गीय समाजाचे घटनात्मक अधिकार संरक्षित राहावेत, आरक्षण अबाधित ठेवावे आणि सामाजिक न्यायाची अंमलबजावणी व्हावी, या मागण्यांसाठी परिषदेने राज्य व केंद्र सरकारकडे देशभरातील ओबीसी जातींची जातीनिहाय जनगणना तातडीने करण्याची मागणी केली. मराठा समाजाला देण्यात आलेल्या सुमारे ५८ लाख ओबीसी प्रमाणपत्रांची फेरतपासणीचा आग्रह धरण्यात आला. शासनाने ओबीसी आरक्षण संरक्षणाच्या नावाखाली स्थापन केलेली उपसमिती तात्काळ बरखास्तीचा मागणी पुढे आली. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत घमासान धोबी समाज आरक्षण कृती समितीचे अनिल शिंदे यांनी मायक्रो ओबीसींच्या राजकीय संधीचा मुद्दा मांडला. निवडणुकांमध्ये ओबीसींनी ओबीसींनाच मतदानाचे आवाहन करण्यात आले. यासाठी शिंदे यांनी महापालिका निवडणुकीचा दाखल दिला. पश्चिम महाराष्ट्रातील एका पालिकेत ओबींसीच्या १८ पैकी १६ ठिकाणी कुणबी समाजाचे अर्थात मूळ मराठा समाजाचे उमेदवार विजयी झाले. परिणामी मूळ ओबीसी वंचित राहिल्याचे त्यांचे म्हणणे होते. या पार्श्वभूमीवर आगामी जि.प. निवडणुकीतही राजकीय आरक्षणावरून घमासान होणार आहे. ओबीसी समाज आमच्या हक्काचा मतदार असल्याचा दावा भाजप नेते करतात. त्या पार्श्वभूमीवर वंचितने ओबीसी आरक्षण बचाव रॅलीही काढली होती. या संघटनांचा सहभाग आंदोलनात अ. भा. कुणबी समाज मंडळ, बारा बलुतेदार महासंघ, अ. भा. समता परिषद, अ. भा. सावता परिषद, धनगर समाज मंडळ, माळी महासंघ, ओबीसी जनमोर्चा आदी संघटना सहभागी झाल्या. काही दिवसांपूर्वी ओबीसी आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले होत. या उपोषणकर्त्यांचही आंदोलनात सत्कार करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *