![]()
एमआयडीसी परिसरातील रासायनिक (केमिकल) उद्योगांमधून बाहेर पडणाऱ्या दूषित सांडपाण्यामुळे आणि विषारी वायूमुळे मुधळवाडी, कारखाना परिसर, नारायणगाव आणि वाहेगाव परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना फुफ्फुसाचे गंभीर आजार जडले असून, शेती पूर्णपणे नापीक झाली आहे. या गंभीर परिस्थितीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अन्न व औषध प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. सुमारे चार दशकांपूर्वी स्थापन झालेल्या पैठण एमआयडीसीमध्ये सध्या ३५ हून अधिक रासायनिक आणि औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या कार्यरत आहेत. या उद्योगांना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कडक नियम पाळणे बंधनकारक असतानाही, अनेक कंपन्यांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. या प्रदूषणविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २०२२ पासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी केल्या. मात्र, संबंधित उद्योगांवर ठोस कारवाई करण्याऐवजी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल करण्यात आल्याचा धक्कादायक दावा संघटनेने केला आहे. “परिसरातील वाढत्या प्रदूषणामुळे शेती, पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाशी संबंधित कंपन्यांच्या मनमानी कारभाराकडे लक्ष वेधण्यासाठी आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, असे पैठणचे माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी हवेत सोडला जातोय विषारी वायू दूषित सांडपाण्याच्या सातत्याच्या वापरामुळे परिसरातील जमिनीची क्षारता वाढली असून, पिकांसाठी आवश्यक असलेली अन्नद्रव्ये नष्ट झाल्याचे कृषी विभागाच्या तपासणीत समोर आले आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. एवढेच नव्हे, तर अनेक कंपन्या रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने हवेत रासायनिक वायू सोडतात. या हवाप्रदूषणामुळे पिकांची पानगळ, फुलगळ आणि फळगळ होत आहे. काही कंपन्या थेट एफडीएच्या अखत्यारीत येत असूनही, त्यांच्यावर कोणतीही देखरेख नसल्याचे चित्र आहे. कारवाईचे आश्वासन Ãपैठण एमआयडीसीमधील केमिकल कंपन्यांतून प्रदूषणयुक्त वायू हवेत सोडला जात असेल तर या संदर्भात चौकशी व पाहणी करून कारवाई करण्यात येईल. – अच्युत नंदवटे , प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी, छत्रपती संभाजीनगर
Source link
दुर्लक्ष:पैठण एमआयडीसीतील सांडपाणी, विषारी वायुमुळे नागरिकांचे आरोग्य, शेती धोक्यात